संस्मरणीय पहाट : दत्त जयंती

यंदा कोरोनामुळे औदुंबरमध्ये होणारा दत्त जयंती सोहळा - यात्रा प्रशासनाने रद्द केली तसेच औदुंबरला लोकांच्या काळजीपोटी संचारबंदी केली. 🙏

आम्हा व्यायाम करनाऱ्या मित्रांचा मात्र थोडा हिरमोडच झाला. दोन दिवस संचारबंदीमुळे औदुंबरला व्यायामला जाण्याची अडचण निर्माण झाली.😌

रात्री अमोल बरोबर चर्चा करून औदुंबरला न जाता भुनेश्वरवाडीला Morning Walking ला जाण्याचा Plan केला.⌚

पहाटे ४:४० उठून नेहमीप्रमाणे थंड पाण्याने आंघोळ करून आवरून तयार झालो. (या Lockdown मध्ये मी लावून घेतलेली सवय म्हणजे गार पाण्याने आंघोळ, कितीही थंडी, पाऊस असूनदे हा नियम मी फारसा मोडला नाही.)👍

आज अमोलला उशीर झाला, नेहमी ५:२० ला सुरवात करणारे आम्ही आज मात्र ५:५० ला निघालो. रस्ता नेहमीचा नसल्याने आज जरा अडखळतच  सुरवात झाली.👐

भुनेश्वरवाडीला पोहचल्यावर प्रथम आम्ही दत्त महाराजांचे मुळ स्थान असलेल्या मंदिरात गेलो. आज दत्त जयंती असल्याने मंदिर परिसरात छान रांगोळ्या घातल्या होत्या तसेच दिवे लावल्याने पहाटेच मंदिर अधिक प्रसन्न वाटत होत.

भुनेश्वरीदेवीचे मंदिर 

दत्त महाराजांचे मुळ स्थान @ भुनेश्वरवाडी

दत्त महाराजांचे मुळ स्थान @ भुनेश्वरवाडी


दत्त महाराज प्रथम भुनेश्वरवाडीला आले, काही दिवस तेथे राहून औदुंबरला आले, तेथून पुढे नरसोबाचीवाडी आणि तेथून गाणगापूरला गेले असा उल्लेख गुरुचरित्रात १७ व्या अध्यायात आहे.🚩

नेहमी आम्ही औदुंबरच्या आरतीला हजर असतो, आज नियम चुकनार अस वाटल मात्र मूळ मंदिरात आम्ही पोहचलो आणि पुढील पाच मिनिटांनी आरतीला सुरवात झाली.💓

प्रसन्न शांतता

दत्त महाराज आणि भुनेश्वरीदेवीचे दर्शन केल्यावर आम्ही कृष्णा नदीच्या काठावर गेलो तिथून औदुंबरचे दर्शन घेतेले आणि भिलवडीला येण्यास निघालो.🏃

औदुंबर - View From भुनेश्वरवाडी

औदुंबर - View From भुनेश्वरवाडी


४ किमी Walking 🏃, पहाटेच दत्त व भुनेश्वरीदेवीच दर्शन 🙏, शांतता, Positive Thinking 🌞, Photography आणि गरमागरम चहा 🎉. आजुन काय हव ?


                                                                  
संस्मरणीय पहाट : दत्त जयंती संस्मरणीय पहाट : दत्त जयंती Reviewed by Vaibhav Kavade on Tuesday, December 29, 2020 Rating: 5

4 comments:

Powered by Blogger.