यंदा कोरोनामुळे औदुंबरमध्ये होणारा दत्त जयंती सोहळा - यात्रा प्रशासनाने रद्द केली तसेच औदुंबरला लोकांच्या काळजीपोटी संचारबंदी केली. 🙏
आम्हा व्यायाम करनाऱ्या मित्रांचा मात्र थोडा हिरमोडच झाला. दोन दिवस संचारबंदीमुळे औदुंबरला व्यायामला जाण्याची अडचण निर्माण झाली.😌
रात्री अमोल बरोबर चर्चा करून औदुंबरला न जाता भुनेश्वरवाडीला Morning Walking ला जाण्याचा Plan केला.⌚
पहाटे ४:४० उठून नेहमीप्रमाणे थंड पाण्याने आंघोळ करून आवरून तयार झालो. (या Lockdown मध्ये मी लावून घेतलेली सवय म्हणजे गार पाण्याने आंघोळ, कितीही थंडी, पाऊस असूनदे हा नियम मी फारसा मोडला नाही.)👍
आज अमोलला उशीर झाला, नेहमी ५:२० ला सुरवात करणारे आम्ही आज मात्र ५:५० ला निघालो. रस्ता नेहमीचा नसल्याने आज जरा अडखळतच सुरवात झाली.👐
भुनेश्वरवाडीला पोहचल्यावर प्रथम आम्ही दत्त महाराजांचे मुळ स्थान असलेल्या मंदिरात गेलो. आज दत्त जयंती असल्याने मंदिर परिसरात छान रांगोळ्या घातल्या होत्या तसेच दिवे लावल्याने पहाटेच मंदिर अधिक प्रसन्न वाटत होत.
![]() |
भुनेश्वरीदेवीचे मंदिर |
![]() |
दत्त महाराजांचे मुळ स्थान @ भुनेश्वरवाडी |
![]() |
दत्त महाराजांचे मुळ स्थान @ भुनेश्वरवाडी |
दत्त महाराज प्रथम भुनेश्वरवाडीला आले, काही दिवस तेथे राहून औदुंबरला आले, तेथून पुढे नरसोबाचीवाडी आणि तेथून गाणगापूरला गेले असा उल्लेख गुरुचरित्रात १७ व्या अध्यायात आहे.🚩
नेहमी आम्ही औदुंबरच्या आरतीला हजर असतो, आज नियम चुकनार अस वाटल मात्र मूळ मंदिरात आम्ही पोहचलो आणि पुढील पाच मिनिटांनी आरतीला सुरवात झाली.💓
![]() |
प्रसन्न शांतता |
दत्त महाराज आणि भुनेश्वरीदेवीचे दर्शन केल्यावर आम्ही कृष्णा नदीच्या काठावर गेलो तिथून औदुंबरचे दर्शन घेतेले आणि भिलवडीला येण्यास निघालो.🏃
![]() |
औदुंबर - View From भुनेश्वरवाडी |
![]() |
औदुंबर - View From भुनेश्वरवाडी |
४ किमी Walking 🏃, पहाटेच दत्त व भुनेश्वरीदेवीच दर्शन 🙏, शांतता, Positive Thinking 🌞, Photography आणि गरमागरम चहा 🎉. आजुन काय हव ?
संस्मरणीय पहाट : दत्त जयंती
Reviewed by Vaibhav Kavade
on
Tuesday, December 29, 2020
Rating:

Mast 👍🙌🙌
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteसुंदर लेख आहे
ReplyDeleteखूप छान👌👌👌
ReplyDelete