दादा रिटायर्ड झाल्यानंतर काही वर्षांनंतर पुण्याला अतुल सरांकडे राहायला आले साधारणपणे २००७-८ ला.
अतुल सर आणि मी सिंहगड Collage, कोंढव्याला दोघे नोकरी करत असल्यापासूनची ओळख.
एके दिवशी सरांच्या घरी चहापानासाठी गेलो असता प्रथमच सरांचे वडील अर्थात दादांची ओळख झाली आणि पहिल्या भेटीतच आम्ही दोघे मित्रच झालो. 💓
दादा आणि माझ्या स्वभावात काही साम्य होती त्यापैकी एक खाण्याच्या आवडी निवडी. पहिल्या भेटीच आमच्या गप्पा रंगल्या होत्या, त्याच दिवशी रात्री दादा आणि मी जेवायला तिरंगाला गेलो होतो. साठ - बासष्ट तरुण आणि सोबत मी २५-२६ वयाचा. जेवतानाच्या आमच्या गप्पाटप्पा ऐकून शेजारचे खूपच चकित नजरेने बघत होते . बासष्ट वर्षेचा माणूस आणि २५-२६ मी एवढ्या मनमोकळेपणे कस काय बोलू शकतात ? ❓😀
नंतर दोन दिवसांतच दादा माझ्या रुमवर अचानक रात्री ८-९ आले आणि बोलले मागच्या वेळेला तुम्ही जेवायला नेल होत आज माझा बारी, आवरा आणि चला ! आज मि तुम्हाला दाखवतो पुण्यातील जुन्या अप्रतिम खाणावळी. त्यारात्री जेवताना दादानी जुन्या पुण्याबद्दल खुप माहिती दिली.
दादा ST मधे वाहक महुन नोकरीला होते त्यामुळे फिरायचा कंटाळा कधीच नाही. पुण्यात स्वता रिक्षा चालवत कुटुंबाला आर्थिक हातभार लावत. अंगावर कायम पांढरा शृभ्र ड्रेस आणि गळ्यात रुमाल असा पेहराव करून दादा पुण्यात रिक्षा चालवत.
दादा स्वता कमी शिकलेले पन त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि आज दोन्ही मुले शिकून छान नोकरीला आहेत.
दोन दिवसापूर्वीच दादा वारल्याची बातमी कळली, मन सरकन भूतकाळात गेलं...😢
ईश्वराचे आभार की, कोण कुठून हा माणूस मला माझ्या आयुष्याच्या अत्यंत कठीण वळणावर पुण्यात भेटला ज्यान मला पुढचा यशस्वी असा योग्य मार्ग दाखवला !!!!! 🙏
भावपूर्ण श्रध्दांजली !!!!!!!!!! खडीमशीन झिंदाबाद !!!!!!
Move On With Dada's Sprite !!!!!!!!!!! 🏃
आपण दादांच्या आठवणींना उजाळा दिला. खरंच दादांच्या वागणं हे कायम सर्वांसोबत मित्रा प्रमाणेच असे. आपले शब्दांकन वाचून खूप आनंद झाला. दादा आता नाहीयेत पण आठवणींच्या रूपात ते कायम आपल्या सोबतच राहतील.
ReplyDelete