कृष्णाकाठची भटकंती 👀

दोन दिवसापूर्वी माझ्या मुलीचा EVS या विषयाचा Animal Kingdom या धड्याचा अभ्यास घेत होतो. खूप वेळा मुलीला Concept समजावून आणि पाठ करून घेत होतो.

थोड्यावेळाने मला मला वाटल की मुलांना आपण प्राण्यांच - पक्षांचे विश्व प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यात जावून त्याना अधिक समजावून सागू शकतो.

मित्र अमोल वंडे यांनी आमनापुरचे प्रसिद्ध साहित्यिक आणि पक्षी निरीक्षक श्री. संदीप नाझरे याना फोन करून कल्पना सागितली. संदीप सरांनी त्यांचा  अमूल्य असा वेळ आम्हाला रविवार पक्षी निरीक्षणासाठी दिला.

रविवारी दोन्ही मुल सकाळ पासून वेगळ्याच धुंदीत होती. अभ्यासक्रमात वाचलेले पक्षी प्रत्यक्षात पहायचे या कल्पनेने भारवलेली होती. इतर रविवारी /१० पर्यंत डाराडुरपणे झोपनारे  दोघे आज मात्र सकाळी ला आवरून तयार झाले.

मी, माझी दोन्ही मुले, अमोल वंडे  आणि निलेश उंडे सकाळी बरोबर ला आमनापुरला जान्यास निघालो. आमनापुरच्या पुलावरच संदीप सर आमची वाट पाहत होते, त्यानी खूणेनेच मागे येन्याचा इशारा केला. साधारण किलोमीटर पुढे गेल्यावर आम्ही सर्वजन आमनापुरच्या कुरणात पोहोचलो. गाडीतुन उतरताच प्रथम संदीप सरांचे त्यांनी आम्हाला दिलेल्या वेळेबद्दल आभार मानले.

संदीप सरानी सर्वांना कृष्णा नदीच्या काठावरील कुरणाच्या दिशेने न्यायला सुरवात केली. जसजसे नदीच्या जवळ गेलो तसे नदीपात्रता आगमन झालेल्या चीन, तिबेटी पक्षी पहायला मिळाले.

वाळू उपसा, नदीकाठच्या मातीचा उपसा आणि अन्य मानवी कारणाने कृष्णा नदीच्या काठावरील वन्यजीवनावर  झालेले परिणाम आणि बदल त्यानी अतिशय योग्यरीत्या समजावून सागितले आणि भविष्यात काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि मानवाने निसर्गाप्रती काय बदल करायला हवेत हेही स्पष्ट शब्दात सागितले.

नदीकाठावरील पक्षी निरीक्षण करत असताना आम्हाला मगरींचे दर्शन झाले. नदीमधे प्रत्यक्ष मगर पाहताना मात्र आंगावर काटा आला.

मगरीला पाहून मात्र माझ्या मुलाला अभ्यासक्रमामधील Animal Kingdom  धडा आठवला आणि तिला नेमके समजल की आपण नक्की काय शिकत होतो.

साधारणपणे 1-2 तास आम्ही कृष्णा नदीच्या काठावर व्यतीत केला ज्यामध्ये विविध पक्षी आणि मगरी पाहायला मिळाल्या. आता मात्र दोन्ही मुले दमली आणि आम्ही परतीचा रस्ता धरला.

धन्यवाद म्हणून वडिलांच्या कवितासंग्रहाचे पुस्तक सरांना भेट दिले आणि पुनश्च आभार मानून परतीला लागलो.🙏

Photo Click and Credit - Sandeep Nazare Sir

Exploring Krishna River


Thanks Sandeep Nazare Sir


Thanks Sandeep Sir 


Birds @ Krishna River



कृष्णाकाठची भटकंती 👀 कृष्णाकाठची भटकंती 👀 Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, December 13, 2020 Rating: 5
Powered by Blogger.