Walking Warriors @ औदुंबर

औदुंबर, सांगली जिल्ह्यातील प्रसिद्ध देवस्थान. दत्त महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले मंगल ठिकाण.

सध्या कोरोनामुळे गावी भिलवडीला असल्याने दररोज सकाळी औदुंबरला Walking / Running ला जातोच. आज फक्त Post / Blog  लिहिण्याचा प्रयत्न. 

औदुंबरच्या प्रसन्न वातावरणाची अनुभूती घ्यायची असेल तर Walking अथवा Running ला  ब्रम्हमुहूर्तावरच जा ! त्याशिवाय खरी मजा आणि अनुभव मिळणारच नाही. 

आज रविवार असल्याने पहाटे ४:२० ला उठून , आवरून ५ ला तयार झालो. साधारणपणे ५:०५ ला औदुंबरच्या दिशेने Walking ला सुरवात केली. 

पहाटेच्या मंद प्रकाशात दत्त महाराजांची गाणी एकत चालताना एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळत होती.

काही मिनिटांनी औदुंबरला पोहोचल्यानंतर, नमो नारायनानंद तीर्थ स्वामी महाराज मठ ( नवीन मठ) समोरील प्रशस्त जागेवर नेहमीप्रमाणे महाराजांना नमस्कार करून Routine व्यायामाला सुरवात झाली. 

समोर संथपने वाहणारी कृष्णा, दत्त मंदिरातील पूजाअर्चाचा आवाज व पाठमोरील विजेच्या खांबावरील दिव्यांच्या प्रकाशाने व्यायाम करताना स्वताची मोठी  छाया नदीपात्रात पडत होती. एका वेगळ्या विश्वात आल्याचा भास होत होता. 

व्यायाम पूर्ण झाल्यावर औदुंबर वृक्षखाली काहीकाळ ध्यानधारणा केल्यावर मात्र मन अतिशय प्रसन्न झाले. व्यायामाबरोबरच योग-ध्यानधारणा करणे किती महत्त्वाचे आहे याची मनाला खात्री पटली. 

प्रसन्न मनाने दत्त महाराजांचे दर्शन घेवुन घरी जाण्यासाठी पुन्हा पायी निघालो. 

Schedule - 

* 5:10 am - 5:40 am - Walking 

* 5:40 am - 6:15 am -  Exercise

* 6:15 am - 6:35 am -  ध्यानधारणा 

* 6:40 am- 7:10 am -  Walking back to home

Audumbar

                   Audumbar Datta Mandir



Walking Warriors @ औदुंबर Walking Warriors @ औदुंबर Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, December 20, 2020 Rating: 5

2 comments:

Powered by Blogger.