चोपडेवाडीचा अनामिक.

ओक्टोंबर महिन्यात माझा पाय मुरगळला होता. किमान  2 आठवडेतरी नीट चालता येत नव्हते. 😟ओक्टोंबर महिन्यातील अश्याच एका रविवारी सकाळी ७ ला Walking ला चोपडेवाडी रस्त्यावर गेलो होतो. पायाने जास्त चालता येत नसल्याने अर्ध्या वाटेतुनच परत फिरलो. घरी परत येत असताना साधारणपणे ५५-६० वयाचा गृहस्थ दुचाकीवरुन मला Pass करुन अर्धा किलोमीटर पुढे जावून थाबंला.😐

व्यक्तीतर अनोळखी होती. मला वाटल ते मला ओळखत असावेत. मला त्यांनी हाक मारली. नीट चालता येत नाही हे त्यांच्या लक्षात आले . गाडी त्यानी वळवली आणि माझ्याकडे आले. मला नाव - गाव विचारले. माझ्या लक्षात आल तेही  मला ओळखत नव्हते. माझ नाव सांगितल्यावर मात्र त्यांनी मला ओळखले.😊

पहिलाच प्रश्न त्यांनी विचारला - व्यायाम किती दिवसांपासून करत आहे ? मी त्यांनी विचारलेल्या पाच सहा प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.✅❎❌❓

थोडा Pause घेवून ते म्हणाले - तु व्यायाम करतो ! एकदम भारी !!!  व्यायामाने काय फरक पडला ? आयुष्यात काय बदल झाला ?❗

पहिल्या प्रश्नाच उत्तर देता आल. पन आयुष्यात काय फरक पडला याच उत्तर ….?👀

त्यानंतर त्यांनी मला काही गोष्टी Share केल्या की ज्या मला खुप अनुभव देवून गेल्या. 💓

व्यायाम हा सकाळी सूर्य उजडायच्या आत पूर्ण झाला पाहिजे. सकाळी साडे सहाला व्यायाम करून घरी पाहिजेच. पहाटेची आपल्याला मिळालेली ऊर्जा ही आपल्या घरापर्यंत आणि घरातील लोकांपर्यंत आपल्या माध्यामातून पोहचलीच पाहिजे.🌞

२ सकाळी ४- ४:३० ला उठायच म्हणजे उठायचच !!👍👆

पहाटे लवकर उठणे म्हणजे स्वतःने स्वताला Accept करणे. जर तु स्वतःला Accept करत नसशील तर जग तुला Accept करनार नाही.  सकाळी लवकर उठुन व्यायाम केल्याने आयुष्यातील अनेक Objective अपेक्षित वेळेपूर्वी लवकर साध्य होतात.💪

3 सर्वोत्तम Planning साठीची वेळ  पहाटेचीच.👌

पहाटे चालताना अतिशय दुरवरचे पक्ष्यांचे आवाज ऐकू येतात जे सकाळी आपल्याला ऐकू येत नाहीत. 

याचा अर्थ की जर मला पहाटे दुरवरचे आवाज ऐकू येवू शकतात तर मला आज - उद्या आणि महिन्यात आणि वर्षभरात स्वतःला काय काय करायच आहे हे ही समजू शकत.

पहाटे ज्यावेळी व्यायामाला जाल त्यावेळी सभोवतालचा पूर्ण परिसर शांत. फक्त तुच जागा. हिच वेळ असते ज्यावेळी तु निसर्गाला समजू शकतो . Planning आणि पुढील Forecasting करू शकतो.

  एखादी गोष्टी Solve  / जमत नसेल  / होत नसेल तर अश्या गोष्टी विषयी Walking करताना Thinking कर. बऱ्याच अडचणी या Walking करताना केलेल्या विचाराने Solve होतात. Walking करताना no discussion, but discuss with your mind. 💖

  नुसता व्यायाम करून उपयोग नाही. वाचन, मनन आणि चिंतन पाहिजे. व्यायामाने शरीर मजबूत तर वाचनाने मन मजबूत होते.📅📅📃📃📋📋

 पहाटेच्या वेळी व्यायामाला येणाऱ्या अनोळखी लोकांचा संपर्क वाढव.👬👭

पहाटे व्यायामाला येणाऱ्या लोकांची wave length / विचार हे जुळणारे असतात. अश्या लोकांच्या मैत्रीचा फायदा हा वैयक्तिक आयुष्यात नक्कीच होत असतो.👍👍🌠

व्यसन नाही. व्यसन करायचेच असेल तर ते गरजूला मदत करण्याचे व्यसन लावून घे.✋

जवळपास 45 मिनिटे आम्ही बऱ्याच गोष्टींवर गप्पा मारल्या त्यांनी त्यांचा अनुभव माझ्याबरोबर Share केला. 

ते गृहस्थ भेटल्यापासून आज साधारणपणे दोन- सव्वा दोन महिने झाले मी पहाटे ४ : ३०-४० ला  उठायचा नियम Follow केला आहे. जो माझ्या आता अंगवळणी पडला आहे आणि बऱ्याच नविन गोष्टींचा चांगला अनुभवपन मिळाला आहे. 

त्यादिवशी घरी परत असताना संत निर्गुण निर्भय कबीर यांचा दोहा आठवला.

कहाँ से आया कहाँ जाओगे

बर करो अपने तन कीको

ई सदगुरु मिले तो भेद बतावें

खुल जावे अंतर खिड़की

चोपडेवाडीचा अनामिक. चोपडेवाडीचा अनामिक. Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, January 10, 2021 Rating: 5

1 comment:

  1. अमित देवJanuary 10, 2021 at 8:52 PM

    खूपच सुंदर लेख अणि सकाळी लवकर उठण्याचा फायदाच आहे....

    ReplyDelete

Powered by Blogger.