नेहमीप्रमाणे आम्ही व्यायाम संपल्यानंतर साधारणपणे १५-२० मिनिटे प्राणायाम / ध्यानधारणा करतो. काही दिवसांनी अस जाणवल की आपल्याला प्राणायामची शास्त्रोक्त माहिती घेतली पाहिजे. मी आणि अमोलने अस ठरवले की नविन दशकाची आणि अर्थातच नविन वर्षाची सुरवात प्राणायामच्या कोर्सने करायची.
किरणला मी खूप दिवसापासून ओळखतो. तोही व्यायामाला पहाटे असतोच फक्त दोघांच्या वेळेमध्ये थोडाफार फरक. किरणला प्राणायामची शास्त्रोक्त माहिती आहे आणि तो स्वतः त्यामध्ये माहीर आहे हे मला समजल्यावर मी खुपच आश्यर्यचकीत झालो. किरणमुळे आम्हाला प्राणायाम शिकवणारा अगदी जवळचा असा सहकारी भेटला.
किरण नोकरीला आटपाडीला असल्याने तो आठवड्यातील तीन दिवस आमच्यासाठी उपलब्ध होणार होता. त्यामुळे आम्ही त्याच्या सोइस्कर अशी वेळ आणि दिवस निवडायचे ठरवले. किरणने औदुंबरला गणेश मंगल कार्यालयला पहाटे ५ ते ६:३० प्रोग्राम करायचा निश्चित केला.
१ जानेवारीला आम्ही सकाळी ५ ला गणेश मंगल कार्यालया जमायच ठरवल. पहिल्या दिवशी आवरून बूट घालत होतो त्याचवेळी मला फोन ( पहाटे ५:१५) आला. आजून का पोहचला नाही ? मी पटापट बुट घातला आणि पळतच औदुंबर गणेश मंगल कार्यालय गाठल. अमोल आणि किरण माझीच वाट पाहत होते. माझ्यामुळे उशीर झाल्याने माझ मन खजील झाल. मला स्वतःला Time Management वर काम केल पाहिजे हे समजल.
पहिले तीन दिवस किरणने अतिशय प्राणायामच्या अत्यंत Basic पासून सुरवात केली. किरणने आम्हाला खालील मौल्यवान अश्या काही गोष्टी शिकवल्या ज्या माझ्यासाठी खूपच नविन मात्र प्रेरणादायी अश्या होत्या.
१ प्राणायाम / व्यायाम / ध्यानधारणानेच्या पूर्वी मानसिक स्थिती कशी असावी ?
२ कोणत्या मानसिकतेत आल्यानंतर प्राणायामला सुरवात करावी ?
३ ध्यानधारणेला पुरक असे व्यायामाचे प्रकार.
४ श्वाशोश्वास कसा करायचा ?
५ ॐकार करताना श्वास कसा असला पाहिजे ?
६ प्राणायाम कसा करायचा ?
किरणने तीन दिवस आमच्याकडून प्राणायाम / व्यायाम / ध्यानधारणा करवून घेतली. योग्य मार्गदर्शन आणि काही महत्त्वाच्या अश्या Tips दिल्या.
मित्र म्हणून किरण विषयी माहिती होतीच मात्र त्या तीन दिवसानंतर किरणचे आणखी काही वाखाणण्याजोगे गुण जाणवले ते असे -
किरण एकदम शांत आणि मन स्थिर. कोणतीही बाष्कळ बडबड नाही. योग्य आणि निवडक बोलणे. चालताना मन एकदम स्थिर.
तीन दिवसाचा Course ( पहिला टप्पा ) केल्यावर मला थोडा थकवा आला. मग मात्र मी दोन दिवसाची व्यायामाला सुट्टी घेतली. नंतरच्या पुढच्या आठवड्यापासून माझ्या नेहमीच्या वेळापत्रकात मी किरणने शिकवलेले व्यायामाचे प्रकार / प्राणायाम / ध्यानधारणा सामील केली आहे. प्राणायामामुळे मला साधारणपणे पंधराएक दिवसात मला माझ्यात बऱ्यापैकी काही फरक जाणवले.
ध्यानधारणेने आत्मबल आणि स्वतःविषयीचा आत्मविश्वास अधिक जागृत होतो.
लवकरच आता राहिलेला चार दिवसांचा Advance कोर्स मी पुण्याला जायच्या आत नक्की पूर्ण करून घ्यायचा निश्चित केला आहे. योग्य मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद किरण पाटील ! !
प्राणायाम मार्गदर्शन - किरण पाटील. |
धन्यवाद किरण पाटील. |
No comments: