मित्रांनो, प्रथम नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !🎅🎉
नविन वर्षाचा संकल्प म्हणून आपण सर्वांनी चालण्यास अथवा धावण्यास सुरवात केली असणार हे नक्की ! ✅📌
चालण्यास सुरुवात करण्यापूर्वी आपण सर्वांना काही योग्य अश्या सवयी अंगी बाळगणे आवश्यक आहे जेणेकरून ही चालण्याची सवय कायमस्वरूपी राहिली पाहिजे.
1 चालण्यास योग्य जागा शोधा. 👀
सहसा काय होत, सुरवातीला आपले मित्र जिकडे चालण्यास जातात तिकडे आपण जातो. मग भले तो रस्ता आपल्यासाठी चांगला असू दे अथवा नसू दे.
नेहमी आपणांस चालण्यास योग्य अश्या जागेचा शोध घ्या ! 💭
आपण ज्या रस्त्यावरुन चालणार आहोत तो रस्ता परिचयाचा आणि चांगला असावा. महत्त्वाचे म्हणजे त्या रस्त्यावर सकाळी वाहनांची फारशी वर्दळ नसावी. थोडक्यात अशी जागा शोधा जी तुम्हाला योग्य असेल आणि तिथे गेल्यावर तुमचे मन प्रसन्न होइल.
2 चालण्याचे वेळापत्रक करा.⏳
एकदा का चांगली जागा मिळाली लगेचच स्वतःचे चालण्याचे वेळापत्रक तयार करा. सुरवातीला कमीतकमी ४५ मिनिटे चालण्याचा व्यायाम करायचा आहे असे गृहीत धरून वेळापत्रक बनवावे.
सकाळी कितीला उठावे लागणार, चालण्यास लागणारा वेळ, घरी कितीला परत येवू या सगळ्याचा अंदाज घेवून वेळापत्रक तयार करा. आणि हो ! सुट्टीचा दिवस कोणता हे ही ठरवायला विसरू नका.
३ ड्रेस कोड.👞👕
कित्येकजन Walking ला Jeans वर किंवा बरमुडा आणि चप्पल घालून येतात. आपल्या अश्या अवताराने Feel Good वातावरण रहात नाही. आपल्या बरोबर दुसऱ्याच्या उत्साहाचा आपण हिरमोड करत असतो.
चालण्यासाठी बूट, मोजे नक्की खरेदी करा आणि त्याचा वापर नेहमी करा. बुटाने पायांना Support मिळतो तसेच चालताना योग्य अशी Grip मिळते. पाय वाकडे - तिकडे पडत नाहीत. शक्यतो लाल, पिवळा, पांढऱ्या रंगाचे Sport T Shirt वापरा. अंधारात हे रंग उठून दिसतात.
थोडक्यात काय तर, चालताना लागणाऱ्या Basic गोष्टी आपाआपल्या गरजेनुसार घ्या आणि हो सोबत आपला उत्साह.
१) एक जोडी स्पोर्ट्स शूज २) शॉर्ट किंवा लेगिन्स ३) टी-शर्ट ४) महिलांसाठी स्पोर्ट्स ब्रा हेअर बँड
५) स्पोर्ट्स वॉटर बॉटल आणि ६) उत्साह.
4 सुरवातीला हळूहळू पन नियमितपणे. 🚶👣
चालण्याची सुरुवात करताना प्रथम कोणतेही मोठे ध्येय बाळगू नका. ( जसे की आज मी ५/१० किमी चालणारच तेही इतक्या इतक्या वेळात. )
नाही ! सुरवातीला कोणतीही अपेक्षा ठेवू नका फक्त आणि फक्त एकच मनाशी बाळगा मी हा चालण्याचा व्यायाम नियमित ठेवणार. बस्स ! सुरवातीला हेच काफी झाल.
हळूहळू सुरवात करा. उत्साह वाढवत रहा. नियमितपणा कसा राहील याकडे लक्ष द्या. चालताना आपल्या पायाच्या आणि हाताच्या Movement आणि हृदयाच्या ठोक्यांकडे लक्ष द्या ! 💓
४५ मिनिटे दररोज पन न चुकता. 👍 काही दिवसांनी सवय झाली की आपण व्यायामात नक्कीच बदल करु.
५ सुरक्षित चाला. 🚱
चालताना स्वतःला इतरांना अपघात कोणताही होणार नाही याची विशेष काळजी घ्या.
No comments: