दोन तीन वर्षेपूर्वी श्री. छत्रपती शिवाजी महाराज - Management Guru या विषयावर माझ्या कंपनीत काही Management च्या लोकानी Presentation दिले होते.
लहानपणापासूनचा माहिती असलेला इतिहास आणि सध्या प्रकाशित or माहिती होत असलेला इतिहास याच्या पलीकडे आपण फारसे जात नाही.
काही दिवसांनी मी महाराजांचा इतिहास पुन्हा वाचायला सुरुवात केला यावेळी मात्र Corporate Angel च्या बाजूने इतिहास समजावून घ्यायला सुरवात केली आणि लक्षात आले की इतिहासाबरोबरच आपल्याला महाराजांचे व्यवस्थापकीय कौशल्य शिकली पाहिजेत.
आजच्या युगात कोणती व्यवस्थापकीय कौशल्य आत्मसात केल पाहिजे याचा अंदाज इतिहासातील काही घटनांचा अभ्यास केला असता मला समजली, जी माझ्या भाषेत थोडक्यात मांडत आहेत.
1. VISION पाहिजे.🌞
आयुष्यात काहीतरी करायचे असेल तर सर्वात प्रथम स्वतःचे असे त्या गोष्टीप्रती मोठे VISION करा की जे तुम्हाला ती गोष्ट साध्य कायम प्रेरणा देत राहील.
संदर्भ - रायरेश्वर, स्वराजाची शपथ.
2 - TEAM तयार करा.👫👬👭
ज्यावेळी आपण एखाद VISION पाहतो आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न सुरू करतो त्यावेळी लक्षात येईल की आपल्या बरोबर आपल्याला आपल्या VISION साठी झटणारे लोक सुद्धा तितकेच आवश्यक आहेत.
तुमच्या बरोबर तुमचे मित्र / सवंगडी/ कर्मचारी असे निवडा की जे तुमचे VISION साध्य करण्यासाठी तुमच्या बरोबरीने उभे राहतील, तुम्हाला योग्य सल्ला देतील.
संदर्भ - रायरेश्वर, स्वराज्य शपथ आणि सोबतचे मावळे.
3- LOCAL पासून सुरुवात करा.🏠
VISION मोठे आहे म्हणून सुरवातीलाच मोठ्या गोष्टी साध्य करण्याचा प्रयोग अथवा प्रयत्न करू नका. अपयश येण्याचा धोका जास्त.
जे VISION आहे त्याच छोट VERSION LOCAL ला ACHIVE करण्याचा प्रयत्न करा.
LOCAL च्या बऱ्याच गोष्टी माहिती असतात त्यामुळे यश मिळण्याची खात्री जास्त.
Think Big But Start With Local 👍
संदर्भ - तोरणा किल्ला स्वारी.
4- बुद्धिचातुर्य वापरा.💡⚡🔑
LOCAL ला यशस्वी झाल्यावर थोडे आपल्या परिघाच्या बाहेर पडलो की समजत आपल्या सारखे भरपूर आहेत अन आपल्या पेक्षा मोठेपन आहेत. अस वाटायला लागत की आपल्याला हे नाही जमनार, आपण अडकून पडू इत्यादी इत्यादी
अश्यावेळी हार पत्करू नका. स्वतःवर FOCUS करा. स्वतःचे TALENT ओळखा. आपण नेहमीच्या गोष्टीत UNIQUE अस काय करू शकतो याचा शोध घ्या.
प्रत्येक गोष्टीत स्वतःच्या बुद्धीचातुर्यच्या वापर करा. पुढचा मार्ग मिळणारच. जो तुम्हाला तुमच्या VISION च्या जवळ घेवून जाणारा असेल. नक्कीच !
संदर्भ - महाराजांचे पत्रव्यवहार.
5- कठिण प्रसंगात सर्वात पुढे उभा रहा.🐅
VISION साध्य करताना अनेक अडचणी, वाईट अनुभव, वाईट प्रसंग येताच असतात.
कठिण प्रसंगात मागे न थाबंता उलट सामना करण्यासाठी सर्वात पुढे उभा रहा. प्रसंगाना सामोरे जा. लढा आणि मार्ग काढा.
LEAD FROM FRONT 👍
संदर्भ - अफजलखान भेट.
6- यश साजरे करत बसू नका.
यश मिळाल की ते साजरे करत बसण्यात वेळ घालवू नका अथवा निवांतपणे राहू नका.
उलट अश्यावेळी आपल्या विस्तारीकरणच्या योजना अमलांत आणा. मिळालेल्या यशाच्या जोरावर -आत्मविश्वासावर आपण पुढील विस्तारीकरण अतिशय कमी कालावधी पूर्ण करु शकतो.
संदर्भ - अफजलखान मृत्यूनंतर महाराजांनी काबीज केलेला प्रदेश.⛳
7- नम्र व्हा. आदर करा 💓
यश मिळाल म्हणून जीवनात कधीही अहंकारी बनू नका.
लोकांशी नम्र वागा. त्यांच्या आदर करा त्यांचा सन्मान करा. आपल्या नम्र वागण्याने विरोधक गळून पडतात आणि कदाचित ते भविष्यातील आपले उत्तम सहकारी बनू शकतात.
⛳शिवजयंतीच्या आपणांस हार्दिक शुभेच्छा.⛳
बाल मावळे काव्या व वरद यांनी महराजांना मानाचा मुजरा केला 🙏 |
Superb!!! Khup chaan lihita tumhi
ReplyDelete