🚩सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.🚩
यंदाचा गुढीपाडवा हा अनेक अर्थानं बदलाची संधी घेऊन आला आहे. 👍 चैत्र महिन्याच्या सुरवातीला निसर्गामध्ये नवीन पालवी फुटायला सुरवात होते. बाहेर कडक ऊन असतं मात्र झाड ही नवीन हिरवगार रूप धारण करत असतात. हा महिना म्हणजे नविन्याची चाहूल करून देणारा. अर्थातच निसर्ग त्याच्या नेहमीच्या भाषेत सांगत आहे. जीवनशैलीत बदल करा.🌈
मागाच्या वेळेप्रमाणे यंदाही कोरोना सोबत आहेच. उलट यंदा अक्राळ रूप धारण केला आहे.👽 हा काही आता लवकर जाणारच नाही आपल्या सोबत कायमचा सोबत राहणार आहे.
गुढी उभा करताना आपण नवीन संकल्प करतो आणि तो साध्य करण्यासाठी वर्षभर जोमाने प्रयत्न सुद्धा करतो.💪🏃
यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणांस आजून वेगळे संकल्प करावे लागतील अर्थातच आरोग्यविषयक.💓 जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे अन्यथा कोरोनाच काय आजून माहिती नसलेले महारोग आपल्या हात धुवून मागे लागतील आणि लागणार आहेत.
यंदाची गुढी उभारूया स्वाथ्याची आणि आरोग्य संवर्धनाची.
चला नवीन संकल्प करू. 🙏
1 वर्षभर नियमित पहाटे लवकर उठणार.✅
2 कमीतकमी 1 तास हा व्यायामासाठी देणार.✅
3 दररोज 5- 6 किलोमीटर चालणार.✅
4 दररोज 4-5 लिटर पाणी पिणार.✅
5 No Smoke - No Alcohol - No Cold Drink.❌
6 योगासने -ध्यानधारणा - प्रणायाम शिकणार. ✅
7 वर्षातून किमान एकदा गरजेच्या आरोग्य चाचण्या करून घेणार.✅
8 आहारात पालेभाज्य फळे यांचा जास्तीत जास्त वापर.✅
9 मास्कचा नियमित वापर.✅
10 सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळंकट करण्यासाठी स्वतःचे शक्य होईल तेवढे योगदान देणार.💯
11 स्वतःच्या जीवनशैलीचा निसर्गाबरोबर शक्य होईल तितका तालमेल साधाणार.🌞🌝🌙🌜🌛
14 आहारात कमी साखर आणि कमी मीठ.
15 सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सर्व नियम पाळणार.🚫
16 ज्यावेळी नैराश्याची भावना होते त्या प्रत्येक वेळी जवळच्या मित्रानंबरोबर / नातेवाईक यांच्या बरोबर बोलणार. नैराश्य वाढीस लागू देणार नाही.💓💞
गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा |
स्वस्थ आयुष्य जगण्यासाठी ३००० रुपये महिना जिम, महागडी औषधे, सप्लिमेंट याची गरज नाहीये..
ReplyDeleteवर दिलेले नियम पाळा, ते काय लई अवघड नाहीये.
Right ! Keep Going !
Delete