"जांभळमाया" - आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन.

वाचन कट्ट्यावरती  सध्या साहित्यिक सुभाष कवडे ( भिलवडी ) सरांच्या "जांभळमाया"या आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन चालू आहे.

🙏अभिवाचक-विठ्ठल मोहिते ( सर  ) सांगली 🙏

जांभळमायाचं हे पहिलं पुष्प"जांभळपर्वच"आहे.झाडाशी नाळ जुळलेल्या एका संवेदनशील माणसाच्या मनातील भाव कल्लोळ अत्यंत हळुवारपणे सुभाष कवडे यांनी साकारला आहे.

अभिवाचक श्री.विठ्ठल मोहिते यांनी आपल्या आवाजाने त्यात प्राण ओतला आहे.👌👌👌👌🌹🌹

अभिप्राय -  द.गो.दाते.विटा.

श्री.सुभाष कवडे लिखित "जांभळमाया"या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचं दुसरं पुष्प"करंजमाया आज ऐकलं.

कोरोनाने भयभीत झालेल्या, नैराश्याने ग्रासलेल्या मनाला पालवी फुटलेल्या करंजासारखी टवटवी आली.

करंजछायेतल्या आठवणींच भावविभोर वर्णन करताना कवडे सरांच्या दारिद्रयाची होरपळ या करंजमायेनेच शीतल झाल्याचे दिसते.ही करंजमाया त्यांच्या बालपणीच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकते.

माणदेशी माणसांच्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकणारे हे प्रातिनिधिक आत्मकथन श्रवणीय आहे.

अभिप्राय - सुरेश खारकांडे - पलूस.

आमचे मार्गदर्शक आदरणीय प्रा. सुभाष कवडे सर यांच्या जांभळमाया, या पुस्तकातील माणदेशी आटपाडी गावचा बाजार, या भागाचे वाचन अवश्य ऐका. 

पन्नास वर्षांपूर्वीच्या बाजाराचे जसेच्या तसे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. कवडे सरांचे लेखन आणि विठ्ठल मोहिते सरांचे वाचन दोन्ही गोष्टी अद्वितीय आहेत. धन्यवाद सर. धन्यवाद.










"जांभळमाया" - आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन. "जांभळमाया" - आत्मकथनात्मक पुस्तकाचे क्रमशः वाचन. Reviewed by Vaibhav Kavade on Saturday, April 17, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.