बर्याच जणांचा असतो तसा माझा ही आवडता वार हा रविवारच. ✅ दरवेळी प्रमाणे आजही रविवारची सुरुवात उत्साहवर्धक आणि प्रसन्न अशीच झाली.🎉 सकाळी पाच वाजता उठून आवरल्यानंतर साधारणपणे साडेपाच वाजता घराच्या बाहेर पडलो. निघताना दोन ग्लास पाणी आणि मस्त चिक्कू खाल्ला.
सर्वत्र अंधार, पक्षांची किलबिल आणि पहाटेची शांतता मनाला प्रसन्न करत होती. कृष्णा नदीच्या पुलावर आल्यानंतर धावायला सुरुवात केली. दोन-तीन मिनिट धावल्यानंतर अचानक उत्साह कमी झाला. 😖
मोठ मोठे खेळाडू म्हणतात ते खरंच आहे. धावणे हा मेंटल फिटनेसचा क्रीडा प्रकार आहे. धावण्यापूर्वी तुमच्या मनाला तयार करणे खूप गरजेचे आहे.👍
काहीतरी चेंज म्हणून थोड्या वेळाने मोबाईल मधील गाणी चालू केली. आणि पहिल्याच गाणं चालू झालं लगान या चित्रपटामधलं.
आजा रे आजा रे
भले कितने लम्बे हों रास्ते, हो
थके न तेरा ये तन, हो
या गाण्याचे शब्द कानावर पडताच माझं मन तयार झालं. मनातल्या निश्चयाने उसळी मारली आणि धावायला सुरुवात झाली.💥 आज पंधरा किलोमीटर धावायचा निश्चयच केला. त्यासाठी डेस्टिनेशन पॉईंट म्हणून आमणापूरला जाण्याचं ठरवलं.
वाऱ्यामुळे उसाच्या शेतामधून सळसळ असा आवाज येत होता . एक प्रकारचं सुरेल संगीतच म्हणांना. आमणापूरचा परिसर हा निसर्गरम्य. धावताना प्रत्येक पावलावर अद्भुत असा निसर्गाचा अविष्कार दिसत होता. सूर्योदय तर अप्रतिमच.🌞
सूर्योदय @ आमणापूर |
सूर्योदय @ आमणापूर |
आमणापूरच्या पुलावर आल्यानंतर आमचे मित्र आणि गुरुवर्य संदीप नाझरे सरांची आठवण आली. डिसेंबर मध्ये त्यांनी मला व माझ्या मुलांना आमनापूरचा निसर्गरम्य परिसर फिरून दाखवला होता. 🙏
गावाच्या चौकात पोहोचल्यानंतर थोडी विश्रांती घेतली आणि मस्त कडक चहा घेतला.☕ चहा घेताना पलूस कॉलेजच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. कॉलेजला जाताना कधी होती मी याच मार्गे जात होतो. त्यावेळचे ते दिवस, मजा आठवली. 😎
@ Destination |
दहापंधरा मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा परतीच्या धावण्याला सुरुवात केली. आता मात्र सुर्यनारायण थोडा वरती आलेला होता. आता धावताना सूर्य माझ्यासमोर तर कधी साईडला होता. सूर्याची किरणे कोवळी होती मात्र उन्हाळ्यामुळे त्याची दाहकता जास्त जाणवत होती. 🔥
आता मात्र मला थोडं दमल्यासारख वाटायला लागलं, मग मी चालायला सुरुवात केली. वाटेत औदुंबर फाटीजवळ मित्र मित्तल कोष्टी भेटला, आम्ही दोघे मिळून भिलवडीपर्यंत चालत आलो.
खरं म्हणजे माणसाचं आयुष्य हे धावण्याची स्पर्धाच आहे. स्पर्धेत टिकायचं असेल, पुढे जायचा असेल तर सातत्याने धावायला लागेल, चालत राहायला लागेल … एक ध्येय ठेवून….. चालत रहा ! 🙏
भिलवडी ते आमणापूर ते भिलवडी. जवळपास चौदा किलोमीटर. त्यापैकी दहा किलोमीटर धावणे व चार किलोमीटर चालणे.🏃🏃🏃 |
Motivational
ReplyDelete