जागतिक योग दिन

आज दिनांक 21 जून रोजी भिलवडी मॉर्निंग वॉकर्स ( BMW ) ग्रुपच्या वतीने श्री किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.🎉

आज पहाटे साडेचार वाजता आम्ही सर्वजण औदुंबर - गणेश मंगल कार्यालय येथे एकत्र जमलो. बरीचशी पूर्वतयारी ही मी किरण आणि साहिलने कालच पूर्ण केली होती.🎯

ग्रुपचे सर्व सभासद एकत्र जमल्यानंतर साधारणपणे पहाटे 5:20 च्या आसपास सुरुवात केली.✌️

प्रसन्न अशा वातावरणात आणि भक्तिमय अशा गाण्यांवरती सुरुवातीला ध्यानधारणा केली.

अश्या ध्यानधारणेचा हेतू हा की - " सुरुवातीला आपल्या मनात रेंगाळणारे विचार हे मनातून  घालवून मन शांत करणे आणि स्वतःला प्रेझेंट मोड मध्ये आणणे "🗿

वीस मिनिटानंतर योगासन करण्यासाठी पुरक असे व्यायाम किरणे सर्वांकडून करून घेतले.🤸‍♂️

सर्वांना जमतील असे काही सोपे - अवघड योगासनाचे प्रकार शिकवण्यात आले. 🧘‍♂️ अर्थातच योगासना बरोबरच श्वासाचे तंत्र देखील समजावून सांगितले जे योगासने करताना अत्यंत महत्त्वाचे आहे.👍

"योगासने करत असताना श्वासोश्वासाचे तंत्र समजावून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे तरच त्याचा शरीराला जास्त फायदा होतो "

कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात प्राणायाम आणि ध्यानधारणा कशी करायची याविषयी माहिती देण्यात आली आणि लवकरच सात दिवसाचा योगासनांचा कोर्स करण्याचे ठरवण्यात आले.👍

योग दिनासाठी ग्रुपचे सर्व सदस्य तसेच ओदुंबरचे नागरिक उपस्थित होते त्या सर्वांचे मनोमन आभार.🙏

श्री किरण पाटील यांचे विशेष आभार 🙏

श्री चिंतामणी जोशी यांनी हॉल उपलब्ध करून दिला. त्यांचेही ग्रुप तर्फे विशेष आभार 🙏

मी स्वतः योगासने आणि ध्यानधारणेतुन खालील गोष्ट शिकलो.

" निसर्गाबरोबर, ब्रम्हांडबरोबर कनेक्ट इंटिग्रेट व्हायचं असेल तर ध्यानधारणेशिवाय दुसरा मार्ग नाही "

" More You Connect With Universe More You Get "

उज्वल भविष्यासाठी ... उज्वल भारतासाठी ....  योग करा.... ध्यान करा.....चालत रहा......🏃🏃
जागतिक योग दिन जागतिक योग दिन Reviewed by Vaibhav Kavade on Monday, June 21, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.