@ मारुती मंदिर, आष्टा रोड
भिलवडी - आष्टा रोडला नागठाण फाटीच्या पुढे काही किलोमीटर अंतरावर एक छोटसं मारुतीचे मंदिर आहे. पूर्वीपासून मंदिर खूपच छोटं आणि बऱ्यापैकी दुर्लक्षित असंच होतं. मात्र तेथील शेतकऱ्याने काही वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करून छोटसं पण छानस मंदिर उभा केलं आहे.
🚩
सध्या हे मंदिर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं एक हक्काचं असं स्थळ झाल आहे. माणूस दोन मिनिटे का असेना पण थांबून दर्शन घेऊन मगच पुढे प्रवासाला निघतो. 🏍️
मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी आणि प्रसन्न मुद्रेची आहे.🚩
पाच दहा मिनिटे जरी या छोट्याशा मंदिरात बसलो तरी सर्व टेन्शन छूमंतर...... ❤
बऱ्याच दिवसापासून ठरवलेला ट्रॅक आज पूर्ण केला 👍 ( योगायोग पण शनिवारी आला ) आणि सोबतीला किरण, निलेश. 🏃🏃
नागठाण फाटा ते मारुती मंदिर ते नागठाण फाटा - 8 KM Walking and Running 🏃
मी काय शिकलो?
आपण केलेले विचार हे नेहमी वस्तू स्वरुपात आपल्या आयुष्यात येत असतात.
No comments: