@ श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र, कुंडल.

आज पहाटे सहा ते साडेआठ असा कुंडल डोंगर ट्रेक केला. अतिशय अनुभव संपन्न आणि मनाला शांती देणारा असा हा ट्रेक, जैन समाजाचे प्रसिद्ध देवस्थान ( श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र ) याच डोंगरावरती आहे. परिसर अतिशय निर्मळ व शांत आहे.

सुरूवातीला काही पायऱ्या, नंतर छोटे-मोठे उतार आणि कधी कठीण असे चढ चढत, मित्रांबरोबर गप्पा मारत, एकमेकांचे अनुभव शेअर करत हा ट्रेक पूर्ण केला.

डोंगरांच्या उंच जागी गेल्यानंतर अचानक रेल्वेचा आवाज ऐकू आला. हिरव्यागर्द शेतांमधुन जाणारी रेल्वे जाताना नजरेस पडली. संपूर्ण ट्रेक मधील हा क्षण आयुष्यभर कधीही न विसरणारा असाच होता.

आज शिवराज्याभिषेकदिनी सह्याद्री पर्वतरांगांमधील छोट्या आणि पवित्र अशा डोंगरावरती जाण्याचा योग आला. हे ही भाग्यच!!!!!!. ( गोष्टी कधीही ठरवून होत नसतात हा माझा अनुभव आहे ).

Lessons I Learned From Todays Trek-

🌹🙏आपल्याला जेव्हा जेव्हा वाटतं की आपण आता उंचीवर आहोत. अश्या प्रत्येकवेळी डोंगर - दऱ्यानमधून चालण्यास बाहेर पडा. चालताना आपल्या पायांचे ठसे मागे राहतील 👣 आणि आठवणी आयुष्यभर बरोबर ✍️.... अनुभवाच्या स्वरूपात 🎁

हा नविन अनुभव आपल्या प्रत्येक कामाची Value Double करेल 🥇आणि आपल्याला आयुष्यात पुढील नव्या उंचीवर आणून ठेवेल 💯......पुन्हा नविन trek करण्यासाठी.🌹🙏

Team BMW ( Bhilawadi Morning Walker's )

संदीप नलावडे, किरण पाटील, निलेश उंडे, साहिल, मित्तल कोष्टी, अमोल वंडे, सागर ऐतवडे.
@ श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र, कुंडल. @ श्री झरी पार्श्वनाथ अतिशय क्षेत्र, कुंडल. Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, June 06, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.