प्रेरणादायी बानुरगड आणि शुकाचार्य ट्रेक

शनिवारी रात्री शुकाचार्य आणि बानुरगड असा ट्रेक करण्याचे ठरवण्यात आले. आपल्या ग्रुपमधील निलेश उंडे, सागर ऐतवडे व अभय मगदूम सोबतीला होते तर किरण पाटील हे आटपाडी वरून आम्हाला जॉईन होणार होते.

रविवारी नेहमीप्रमाणे पहाटे चारला उठलो. आता जवळपास साडेचार पाचला उठणे हा  नित्यक्रमच झाला आहे. 👍

भिलवडी येथील मारुती मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सर्वजण  बानूरगड या ठिकाणी जाण्यास निघालो. 

बानुरगड हा खानापूर तालुक्याच्या सीमेवर वसलेला दुर्लक्षित असा शिवकालीन किल्ला आहे. या गडावर स्वराज्याचे गुप्तहेर श्री बहिर्जी नाईक यांची समाधी आहे.

बानुरगडला कसे जाल?

आपण जर सांगलीतून येत असाल तर सांगली - तासगाव - भिवघाट - बानुरगड असा मार्ग आहे.
सातारा पुण्यावरून येत असाल तर कराड- विटा- खानापूर - बानुरगड असा मार्ग आहे.
सध्या महामार्गाचे काम पूर्ण झाले असून रस्ता उत्तम आहे.

तासाभराचा प्रवास करून आम्ही भिवघाट येथे पोहोचलो. भिवघाट वरून काही पुढे अंतरावरती आमचा रस्ता चुकला. स्थानिक लोकांना विचारत विचारत शेवटी बानुरगडचा रस्ता सापडला. (  आजच्या आधुनिक युगामध्ये जर आम्ही रस्ता चुकत असू तर त्या स्वराज्याच्या काळी मावळे कसं करत असतील? ) 

बानुरगडला पोहोचताच लक्षात आलं की इथे फारशा सुविधा नाहीत. दहा-पंधरा उंबऱ्याचं हे अतिशय छोटे खेड पण इतिहासामध्ये याचं नाव नोंदलं गेलं आहे.

किल्ल्याच्या पायथ्याशी आम्ही गाडी पार्क केली आणि चालत किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो.
किल्ला खूपच छोटा आहे. किल्ल्यावरती  पोहोचताच श्री बाणलिंग देवाचे मंदिर आणि स्वराज्याचे गुप्तहेर श्री बहिर्जी नाईक समाधी यांचे दर्शन घेतले.

दर्शन घेतल्यानंतर आम्ही गडाच्या आजुबाजूचा परिसर फिरण्यासाठी निघालो. गडाच्या् उंच ठिकाणावरून माण देशाचा - खानापूर तालुक्याचा पठारी प्रदेश स्पष्टपणे दिसत होता. विस्तीर्ण अशा पठारी प्रदेशात मध्येच दिसणारी छोटी मोठी तळी, पक्ष्यांचेेे आवाज, दुरवरुन कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि त्याचा इको आवाज स्पष्ट्ट ऐकू येत होता.

एरवी दुष्काळी असणारा हा प्रदेश अलीकडच्या दोन-तीन वर्षातील पावसामुळे हिरवागार झाला आहे. विस्तीर्ण असा पठारी प्रदेशा मधून जाणारा विजापूर महामार्ग आणि त्यावरून होणारी वाहतूक हे दृश्य उंचावरून खूपच मस्त दिसत होतं.

साधारणपणे तासभर आम्ही बानुरगडचा भोवतालचा प्रदेश पालथा घातला. अतिशय उंच दगड, रानावनातील झाडे यातून वाट काढत बानुरगडच्या भोवतालचा संपूर्ण भाग  मनात काही आठवणी साठवत आम्ही पिंजून काढला.

चालत असताना मित्र श्री निलेश  व सागर याने अप्रतिम फोटोग्राफी केली. त्यापैकी काही निवडक छायाचित्रे-
बानुरगड  वरून पुढे आम्ही शुकाचार्यला गेलो. कोरोना काळामुळे येथील मंदिर मात्र बंद होते. इथे अजिबात वेळ न दवडता थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. (आणि हो..भिवघाट मध्ये झणझणीत कट वडा सांबर आणि तासगावला गरमागरम चहा....)


बानूरगडच्या ट्रेक मधून मी स्वतः काय शिकलो? 

आजच्या एकविसाव्या शतकात गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्याकडून काय शिकलं पाहिजे याचा मी ट्रेक करताना मनात विचार करत होतो.

नक्कीच.....नक्कीच..... नक्कीच.....आज गुप्तहेर बनलं  पाहिजे.... मात्र..... मात्र..... मात्र.... फक्त स्वतःसाठी......... आजच्या युगात स्वतःला ओळखलंता  आलं पाहिजे......स्वतःच्या  कमजोर बाजू शोधल्या पाहिजेत........ स्वतःच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय केलं पाहिजे याचा शोध घेतला पाहिजे...... नवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत... स्वतःसाठी गुप्तहेर बनुन.....आयुष्यामध्ये पुढील यश कसं मिळवता येईल याचा विचार केला पाहिजे....

स्वतःच्या कमतरतेवर स्वतः मात करून जो पुढे जाईल तोच एकविसाव्या शतकातील खरा गुप्तहेर. 🙏

 
प्रेरणादायी बानुरगड आणि शुकाचार्य ट्रेक प्रेरणादायी बानुरगड आणि शुकाचार्य  ट्रेक Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, July 18, 2021 Rating: 5

3 comments:

  1. Tumche post khupch preranadayi asatat. Keep it up👍👍

    ReplyDelete
  2. आज गुगल मॅप्स असून आपण रस्ता चुकतो, तिथं राहणारी माणसं रस्ता सांगत्यात म्हणून परत योग्य मार्गावर येतो.
    आधीच्या काळचे गुप्तहेर कमालीचे असतील, रस्ता खडा अन खडा लक्षात ठेवायचे, मला काल लिहिलेला कोड आठवत नाही🤣

    ReplyDelete

Powered by Blogger.