15 ऑगस्ट 2021 - भिलवडी - वसगडे- भिलवडी 16 किलोमीटर

🇮🇳🌹अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या आपणास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🌹🇮🇳

महापुरामुळे व्यायामामध्ये जवळपास पडलेला पंधरा दिवसाचा खंड आणि आज त्यानंतर 15 ऑगस्ट रोजी भिलवडी वसगडे भिलवडी हा सोळा किलोमीटरचा ट्रॅक् चालत धावत पूर्ण केला.

नेहमीप्रमाणे आदल्या दिवशी म्हणजेच शनिवारी मी आणि निलेश दोघांनी ठरवले की भिलवडी वसगडे भिलवडी हा हा सोळा किलोमीटरचा ट्रेक करूया. 15 ऑगस्ट मुळे बरेच जण शासकीय कामांमध्ये व्यस्त असल्याने फारसा प्रतिसाद आला नाही.

सकाळी  पाच वाजता उठल्यानंतर महेश परीट यांचा आलेला प्रतिसाद पाहिला आणि फोन करून कन्फर्म केले. महेश यायला तयारच होता. साधारणपणे पहाटे साडेपाच वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो.

हॉटेल ग्रीन पार्क च्या आसपास आल्यानंतर एक तरुण व्यक्ती मला चालत येताना दिसली. माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्यांना गुड मॉर्निंग म्हणालो आणि त्यांनी झटकन  त्यांचा ट्रॅक बदलून माझ्याबरोबर जॉईन झाले. हॉटेल ग्रीन पार्क ते माळवाडी या जेमतेम दोन ते तीन मिनिटांच्या प्रवासात आमचं बोलणं झालं.

 तीन मिनिटांमध्ये त्यांनी जे काही मला सांगितले ते अप्रतिम आणि भविष्यासाठी मार्गदर्शक असे होते. पहिलंच वाक्य त्यांनी उच्चारलं की व्यायामाशिवाय तरुणांना पर्याय नाही. आज माझं वय 63 वर्ष आहे मात्र मला कधी आठवत नाही की मी इंजेक्शन घेतलं आहे. माझ्या बरोबर कोणीही तरुण व्यायामला नसतो. अवघड आहे... तुमच्या सारखे आणि तुमच्या वयाचे खूपच कमी लोक मॉर्निंग वॉक अथवा  व्यायामासाठी येत असतात. सातत्य ठेवा ! Dont Stop!

श्री बाळासाहेब मगदूम खंडोबाचीवाडी यांनी दिलेला हा सल्ला मला कायम लक्षात राहील. 🙏
 मी  माळवाडी मध्ये आल्यानंतर महेश माझ्यासोबत जॉईन झाला. माझ्या पायाखालचा रस्ता नसल्यान सुरुवातीला आम्ही पायी चालण्याचे ठरवले. साधारणपणे दोन किलोमीटर चालल्यानंतर आम्ही पुढे धावत निघालो.

आज 15 ऑगस्ट असल्याने रस्त्यावरून वाहनांची लगबग होती सगळेजण हे व्हाईट कलरचे ड्रेस घालूनच होते 😊.

काही पुढे अंतरावर गेल्यानंतर मागून गाडीवरून  मित्तल गोष्टी आला. आज झेंडावंदन साठी शाळेत जायचे असल्याने तो आज आमच्यासोबत तो जॉईन झाला नव्हता. मात्र काही का असेना भेटूनच पुढे गेला. Thats Spirit!!!!👍

साधारणपणे एका तासामध्ये वसगडे मध्ये पोहोचलो. इतर वेळेस शांत असणारा वसगडे चा बस स्टॉप  आज मात्र जिलेबीच्या स्टॉलोने सजून निघाला होता. गरमागरम जिलेबी चा वास पसरलेला होता.
"एवढ्या लांबून आला आहे एक तरी जिलेबीचा आकना खाऊन जावा!" स्टॉल धारकाच्या आग्रहाखातर एक आकना खाऊनच आम्ही पुन्हा भिलवडीला निघालो 😄

आज मित्र पिंट्या याने सुद्धा 16 किलोमीटर चा ट्रेक सायकलिंग द्वारे पूर्ण केला. तोही आम्हाला भेटला 👍.

सोळा किलोमीटरचा ट्रॅक करून बरोबर आठ वाजून वीस मिनिटांनी मी घरी पोहोचलो.

आजच्या रनिंग चे वैशिष्ट्य म्हणजे हायड्रेशन लेव्हल प्रॉपर मेंटेन ठेवली होती. 16 किलोमीटर च्या प्रवासात एकदाही पाण्याचा घोट घ्यायला लागला नाही.👌

India is moving fast... Golden Days Are Ahead.... Let's Increase Speed And Catch The Bus...

Keep Walking...... Keep Running...... Keep Moving..... चालत रहा!🏃🏃🏃🏃



15 ऑगस्ट 2021 - भिलवडी - वसगडे- भिलवडी 16 किलोमीटर 15 ऑगस्ट  2021 - भिलवडी - वसगडे- भिलवडी 16 किलोमीटर Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, August 15, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.