चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 1

आपण सगळे सकाळी चालण्याचा व्यायाम करत असतो. मात्र काही दिवसानंतर -  महिन्यानंतर चालण्याचा कंटाळा येऊ लागतो. नियमितता रहात नाही. बरेचदा असं होतं की चालण्याच्या व्यायामामुळे  जे आपलं इप्सित साध्य करायचं असतं ते साध्य होत नाही उदाहरणार्थ वजन कमी करणे आणि मग कालांतराने हळूहळू चालणे हा व्यायाम प्रकार बंद होतो. 👎

चालताना काही स्वतःहून नियम पाळा. 🙏 चालताना काही विशेष बाबींवर लक्ष दिले तर चालणे व्यायाम प्रकाराला आपण खूपच इंटरेस्टिंग बनवू शकतो. 🏃


🔆 नियम क्रमांक 1 🔆

 " चालताना सुद्धा हलका व्यायाम करा " 🔑

 बघा काय होतं की, आपण चार-पाच किलोमीटर दररोज चालतो. अशावेळी पायाचा व्यायामच जास्त होतो. इतर अवयव फारसेेेे हलत नाहीत पर्यायानेेेेेेे त्यांचा व्यायाम होत नाही. चालून चालून मग पाय दुखणेेेेेेेेेेेेेेेेेेेे पाय अवघडणे पायात गोळे येणे असे प्रकार होतात. 💊

लक्षात ठेवा ! फक्त चालू नका. आपण चालता चालता सुद्धा इतर अवयवांचा हलका व्यायाम करू शकतो. जसे की 

* पाच ते दहा मीटर पायाच्या पंज्यावरती चाला. ह्यावेळी हात वरती सरळ रेषेत ठेवा. 👣

* पाच ते दहा मीटर  पायाच्या टाचेवरती चाला. ह्यावेळी हात वरती सरळ रेषेत ठेवा. 👣 👣

* टाळ्या वाजवत चाला. 👋

* चालता चालता उजवा हात जमिनीला टेकवा, पुढच्या पावलावर डावा हात जमिनीला टेकवा. याने पाठीला ताण बसून पाठीचा चांगला व्यायाम होईल. 

* चालताना हातांची हालचाल योग्य होते का यावर लक्ष ठेवा. शक्य तितके हात वरती न्या.

* श्वासावर लक्ष द्या. 💨

जसं की, उजवा पाय पडला की खोलवर श्वास आत घ्या, डावा पडला की श्वास सोडा. किंवा एका पावलावर श्वास घ्या दुसऱ्या पावलावर श्वास सोडा. श्वास  योग्य  प्रकारे घेतल्याने ऑक्सीजन तर चांगला मिळतोच शिवाय दमही चांगला वाढतो. पुढे जाऊन याचा फायदा योगासने करताना किंवा धावताना होतो. योग्य प्रकारे श्वास घेतल्याने  फुफुसाची कार्यक्षमता चांगली वाढते.  कोरोना काळात श्वसनाचे व्यायाम व अत्यंत महत्त्वाचे आहेत.  हा साधा आणि सोपा श्वसनाचा व्यायाम आपण चालताना करू शकतो. 👍

* उलटे चाला. 🏃

कसं होत की, सरळ चालून पायाच्या स्नायूंचा एकाच दिशेला सारखा व्यायाम होतो. उलटे चालल्याने स्नायूंचा विरुध्द दिशेला व्यायाम होतो आणि पायांचे स्नायू रिलॅक्स आणि अधिक मजबूत होतात. 💪

मानसशास्त्र असं सांगतो की, उलटे चालल्यामुळे आत्मविश्वासही वाढतो. ज्यावेळी आपण मागे वळून बघतो त्यावेळी  आत्तापर्यंत कापलेले अंतर (  आयष्यातील आतापर्यंतचा प्रवास ) पाहून स्वतःविषयी अभिमान आणि विश्वास वाढतो आणि आजून मी चालू शकतो ( पुढील भविष्यातील ध्येय गाठू शकतो ) असा आत्मविश्वास येतो. उलटे चालण्याचा हा प्रयोग नक्की करून बघा. चमत्कार घडतील. 🌞

*  मेंगाळल्यागत  वेडे वाकडे पाय टाकत चालू नका.  चालताना स्वतःच्या योग्य Posture कडे द्या. चालताना नेहमी शरीराचे संपूर्ण वजन  दोन्ही पायांवर समान पडते आहे का यावर लक्ष द्या. यामुळे शरीर बांधा चांगला होतो. 💎

* चालण्याचे योग्य Technique शिकून घ्या. पाय पुढे पडताना तो टाचेवर पडला पाहिजे तर त्याचवेळी मागचा पाय हा पंज्यावरती उचलला गेला पाहिजे. 👀

नुसत्या चालण्याने  शरीरातील चरबी लवकर जळणार नाही मात्र वरील गोष्टी चालताना ध्यानात घेतल्या तर कदाचित लवकर आणि चांगला फरक जाणवेल.👍🏃


चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 1 चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 1 Reviewed by Vaibhav Kavade on Saturday, September 18, 2021 Rating: 5

2 comments:

  1. superb all articles... simply loved it n amezing idea's.keep it up n keep writing 👍. Tejaswini S.

    ReplyDelete

Powered by Blogger.