चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 2

मागच्या ब्लॉग मध्ये आपण  चालताना सुद्धा हलका व्यायाम कसा करायचा हा नियम क्रमांक एक समजून घेतला. आता ह्या ब्लॉग मध्ये आपण आता  नियम क्रमांक दुसरा समजून घेवू.

बरेचजण Walking ला ग्रुप मध्ये जातात. बहुतेक जणांचा मॉर्निंग ग्रुप असतोच आणि ग्रुप हा हवाच. आता प्रॉब्लेम कोठे हातो? तर प्रॉब्लेम हा की चालताना आणि चालणे संपू पर्यंत ज्या अनावश्यक / अवांतर बडबड, गप्पा  इतरांबरोबर मारतो. 

नियम दुसरा -  चालताना तोंडाची अवांतर बडबड टाळा त्या ऐवजी स्वतःच्या मनाबरोबर संवाद वाढवा.  ❤

आपल्यापैकी बहुतेकजण मॉर्निंग walk करताना एकमेकांन विषयी, दुसऱ्या विषयी आणि बऱ्याचदा राजकीय नको ती बडबड करून आपला पहाटेचा बहुमूल्य वेळ अक्षरशः वाया घालवत असतो.

पहाटेची वेळ किंवा कोणतीही walking करता ती वेळ, ही दुसर्‍या विषयी चिंतन करण्यासाठी नसून स्वतः विषयी चिंतन करण्यासाठी असते.

चालताना कधीही दुसऱ्याविषयी बडबड करू नका, आपली राजकीय बाजू कधीही दुसऱ्याला समजून सांगू नका, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. अशा अवांतर बोलण्याने आपले व्यक्तिमत्व खराब होत असते.

चालताना नेहमी स्वतःविषयी विचार करा स्वतःच्या मनाबरोबर चिंतन करा. मी काल काय केलं? मी आज काय करणार आहे? मी या महिन्यात काय करणार आहे? असे प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा.

मी नोकरीत उत्तम काम कसे करू शकतो? माझा व्यवसाय दुप्पट कसा वाढवू शकतो? व्यवसाय वाढीसाठी काय केले पाहिजे? पगार वाढीसाठी काय केले पाहिजे? असे एकेक प्रश्न तुम्ही  रोज चालताना स्वतःच्या मनाला विचारा. आपलं मन नाट्यमयरित्या या सर्व प्रश्नांची उत्तर द्यायला सुरुवात करेल.

समुद्रमंथनातून जसं चांगलं-वाईट मिळालं आणि चांगल्याचा स्वीकार केला गेला. अगदी तसंच मंथन हे आपण आणि आपल्या मनाबरोबर करा तसेच शरीराबरोबर करा. आपल्याला मंथनातून चांगले वाईट विचार येतील आणि आपले मन हे फक्त चांगल्या बाजूचा विचार, स्वीकार करायला लागेल.

चांगल्या विचाराचे लोक नेहमी समाजामध्ये  जास्त स्वीकाहार्य असतात.

मिळालेली उत्तरे, चांगले विचार हे चालताना आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीत मिसळतील आणि आपल्या शरीराला, मनाला समजेल की मला काय आणि कसं साध्य करायचे आहे. ते ध्येय साध्य करण्यासाठी शरीरातील प्रत्येक पेशी नव्याने कार्यरत होईल.

चालताना चांगले विचार आपल्या मनातून बाहेरच्या निसर्गात उत्सर्जित होतात आणि निसर्ग सुद्धा आपल्याला तसाच चांगला फीडबॅक देतो.

चालताना आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम विषय सुद्धा आपण चिंतन करा. मन आणि निसर्ग नाट्यमयरीत्या ते प्रॉब्लेम Solve करण्याची पद्धत सुद्धा सांगेल.

आता मला सांगा जर आपण एकमेकांविषयी वाईट बोललो राजकीय गप्पा मारल्या तर आपल्याला आपलं मन आणि  निसर्गाकडून काय फीडबॅक मिळेल? फीडबॅक जरूर मिळेल पण त्याचा आपल्या स्वतःच्या खाजगी आयुष्यात काडीमात्र उपयोग असेल. आपण जर दररोज चालताना विनाकारण बडबड करत असू तर कालांतराने आपला ग्रुपच आपल्याला टाळेल.

आपण जसा विचार करतो त्याच गोष्टी आपल्या आयुष्यात येत असतात हा निसर्गाचा सिद्धांत आहे.

आपण आपल्या ग्रुपमध्ये नक्कीच बोलू शकतो. जवळच्या मित्रांना आपले प्रॉब्लेम सांगा. सल्ला विचारा जवळचे मित्र नेहमीच योग्य आणि चांगले मार्गदर्शन करतात. फारफार तर  अवांतर गप्पा चहा-नाश्ता घेताना करा ही वेळ त्या साठीच असते 😊

 थोडक्यात मित्रांनो चालताना या गोष्टीवर जरूर लक्ष द्या-

* स्वतःच्या मनाबरोबर संवाद वाढवा.
* स्वतःला स्वयंसूचना द्या.
* चालताना चांगले विचार निसर्गामध्ये उत्सर्जित करा.
* जास्त ऐका व कमी बोला.
* जवळच्या मित्रांचा सल्ला घ्या.
* थोडस ध्यान करून मन शांत ठेवा.
* अवांतर बडबड टाळा.  दुसऱ्यांच्या करमणुकीचे साधन बनू नका.

चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 2 चालताना ह्या गोष्टींवर लक्ष द्या. नियम क्रमांक 2 Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, October 03, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.