🏃 चालत - बोलत 4 - औदुंबर वृक्ष 🏃

परवाच्या महापुरात हा वृक्ष पूर्णपणे पाण्यात बुडाला होता. महापूरात वृक्षाची खूपच हानी झाली होती. पानं सुकून वाळून गेली होती. फांद्यांवर वाहून आलेला कचरा साचलेला होता.

काल पडलेल्या पावसामुळे औदुंबर वृक्ष थोडाबहुत आज साफ आणि स्वच्छ झाला. दोन महिन्यापूर्वी सुकलेला वृक्ष आज टवटवीत दिसत होता. पाने फांद्या हिरव्यागार झाल्या.

आता पुन्हा तो आपल्यासारख्या कित्येक लोकांना सावली देण्यासाठी पुन्हा एकदा नटून सज्ज झाला.

 "कितीही संकट आले तरी गळून घाबरून जायचं नाही. संकटांवर  हळूहळू मात करत पुढे जायचं आणि आपलं अस्तित्व सिद्ध करायचं "

औदुंबर येथील औदुंबर वृक्ष 
                     
🏃 चालत - बोलत 4 - औदुंबर वृक्ष 🏃 🏃 चालत - बोलत 4 - औदुंबर वृक्ष 🏃 Reviewed by Vaibhav Kavade on Monday, October 04, 2021 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.