🌞भिलवडी मॉर्निंग वॉकर्स आयोजित "चला आरोग्यासाठी चालूया - 2021" हा आरोग्यदायी उपक्रम आज संपन्न झाला. 🌞
🙏 उपक्रमास भिलवडी आणि परिसरातील नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. जवळपास 160 पेक्षा जास्त नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला. महिलांचा सहभाग लक्षणीय असा होता. 🙏
📣 उपक्रमाच्या सुरवातीला प्रस्तावना आणि उपक्रमाचा उद्देश श्री सुभाष कवडे यांनी समजावून सांगितला. श्री महेश पाटील ( सर ) यांनी उदघोषणा करून हा उपक्रम सुरू केला. 📣
🏃 सदर उपक्रमाअंतर्गत महिलांनी आज भिलवडी ते औदुंबर फाटी ते भिलवडी तर पुरुषांनी भिलवडी ते अंकलखोप हायस्कूल ते भिलवडी असे अंतर पायी चालत सर्वांना आरोग्यदायी संदेश दिला. चालणे, धावणे, व्यायाम आणि योग्य आहाराचे महत्व समजावून सांगितले.🏃
🙏 सहभागी नागरिकांना अल्पोपहार व पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. उपक्रमास लक्षणीय प्रतिसाद लाभल्याने काही सहभागी नागरिकांना भेट स्वरूपात पुस्तक देणे शक्य झाले नाही. अश्या नागरिकांना लवकरच आयोजकांच्या वतीने पुस्तके पोहोच केली जातील. क्षमस्व 🙏
👬 किरण पाटील, मित्तल कोष्टी, महेश परीट, सागर ऐतवडे, निलेश उंडे, अभय मगदूम, साहिल तापेकरी, अभय मगदूम, अमोल वंडे, वैभव कवडे या सर्वांनी उपक्रमासाठी परिश्रम घेतले. 👬
🌹भिलवडी मॉर्निंग वॉकर्स यांच्यावतीने सर्व सहभागी नागरिकांचे अभिनंदन आणि मनःपूर्वक आभार 🌹
No comments: