सारसबाग.

आज दिनांक 13 मार्च रोजी सार्थक सोसायटी ते सारसबाग हा दहा किलोमीटरचा टप्पा चालत धावत दुसऱ्यांदा पूर्ण केला. 👍

कोरोनामुळे जवळपास दोन वर्षानंतर मागच्या आठवड्यात पुण्यात आल्यानंतर पहिला trek  पिसोळी ते सारसबाग करण्याचं मनोमन ठरवलं.

माझ्या कुटुंबाची पुण्यातील सर्वाधिक आवडती जागा म्हणजे सारसबाग. आयुष्यातील छोटी-मोठी प्रेरणा याच सारसबाग मधून मला आणि माझ्या कुंटुंबाला मिळाली. वरद - काव्याला तर सारसबाग मध्ये  गेल्याशिवाय चैनच पडत नाही.😀

 इंटरव्यू मध्ये अपयश आल्यानंतर बागेत बसायचो. तो दिवस ते आज बागे पर्यंत धावत  जाण्याचा दिवस, सगळा काळ fash back प्रमाणे धावताना आज माझ्या डोळ्यासमोर आला. मस्त आणि छान वाटलं.😊

गोळीबार मैदाना जवळ पोचलो असता श्री भास्कर यादव ( वय 73 ) पुणे मूळ गावं सातारा यांची भेट झाली. त्यांच्याबरोबर पाच ते दहा मिनिटे बोलण्याची संधी मिळाली.  त्यांनी मला तीन चार बहुमूल्य अश्या धावण्याच्या Tips दिल्या. 

आज वयाच्या 73 व्या वर्षात सुद्धा ते 21 किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण करतात🏃👍. त्यांच्याकडून मला खूपच प्रेरणा मिळाली. आता आम्ही दोघे पुढील आठवड्यात बोपदेव घाटात भेटणार आहोत. 🙏.
 काल जेम्स रे यांचे पुस्तक वाचताना एक वाक्य वाचनात आलं - " इच्छाशक्ती अपयशाला तर कल्पनाशक्ती यशाला पूरक असते. "

कदाचित सारसबाग हे पुण्यातील एकमेव ठिकाण असेल जिथे तुम्ही तुमच्या आयुष्यातील यशाच्या कल्पना रंगवू शकता. 

धावताना माझ्या स्वतःच्या कल्पना पूर्ण झाल्याचा आनंद होताच....... पण आज पुन्हा कितीतरी नव्या कल्पना डोक्यात घोंगावू लागल्या........ 🏃🏃

चालत रहा........

     सार्थक सोसायटी पिसोळी ते सारसबाग पुणे. 10 KM

                                   



सारसबाग. सारसबाग. Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, March 13, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.