कानिफनाथ | Kanifnath Pune Trekking |

दिनांक : 8 मे 2022

पहाटे साडेपाच वाजता आम्ही सर्वजण बोपदेव घाट च्या दिशेने निघालो. गाडीत बसल्यावर आजचा ट्रेक कुठे आणि कसा करायचा याबद्दल चे नियोजन चालू झाले, आणि अचानकपणे बोपदेव घाट ते कानिफनाथ हा डोंगर माथ्यावरून  ट्रेक करायचे ठरवले. हा ट्रेक आम्ही सर्व जण पहिल्यांदाच करणार होतो.  👌

बोपदेव मंदिराच्या जवळ गाडी लावली आणि तितक्यात दीपक पाटील मागून येत आहे असं समजलं. दीपक पाटील म्हणजे ग्रुपची बहारच. नाद खुळा !! वाघच !! 🐯

साधारणपणे सव्वा सहा साडेसहा वाजता आमचा ट्रेक सुरू झाला. समोरून उगवतीचा सुर्य, डाव्या बाजूला घाटाची दरी तर डाव्या बाजूला सासवडचे पठार आणि समोर लांबवर दिसणारे कानिफनाथाचे मंदिर. 😊

उन्हाळ्याचे दिवस सुद्धा  अल्हाददायक, उत्साहवर्धक असतात हे ही खरंच!!!

आम्ही सर्वजण पहिल्यांदाच हा ट्रेक करत असल्याने नेमका अंदाज नव्हता. रस्ता माहित नव्हता. किती वेळ लागेल हेही माहीत नव्हतं. डोंगर माथ्यावरून रस्ता दिसेल तिकडे चालत जात होतो. गप्पा गोष्टी करत, गाणी ऐकत आणि निसर्गाचा आनंद घेत चालत होतो. 🏃🏃🏃

उन्हाळ्यामुळे झाड सुकलेली होती तर काही झाडे ही दगडाच्या आडोशाला तग धरून डौलाने उभी होती. जणू काही आम्हाला सांगत होती की, कितीही संकट आली तरी आयुष्यात तग धरून उभा राहायचं. 😊  काय पण होऊ दे..... चिकाटी सोडायची नाय!!!!! 🕸️

डोंगरावरून जात असताना एक आशादायक चित्र दिसलं. कोणीतरी त्याने लावलेल्या आंब्याच्या झाडाला पाणी देण्यासाठी चाळीस लिटरचा कॅन उंची वरती ठेवून सलाइन पाईप मधून झाडाच्या मुळाशी पाणी सोडलेलं होतं. किती मस्त !!

आज मातृदिन 🙏 आपल्या सर्वांची निसर्ग सुद्धा आईच आहे. निसर्गातील झाडांची काळजी घेणे आणि या रणरणत्या उन्हामध्ये त्यांना जगवंण हे आपलं कर्तव्य आहे 🙏.

जवळपास चार ते पाच डोंगर चढून उतरून गेल्यानंतर कानिफनाथ मंदिरामध्ये पोहचलो. कानिफनाथाचे दर्शन घेतल्यानंतर आलेला थकवा क्षणार्धात निघून गेला.🌹

 ट्रेकिंग व देव दर्शन झालं की, अर्थातच पोटोबा 😄. कानिफनाथ गडावरील भेळ अप्रतिमच. जसा एक तीळ सात जणांनी वाटून खाल्ला होता तशी आम्ही एक भेळ सहा जणांनी वाटून खाल्ली. संदीपचा जोर नेहमीप्रमाणे मिरचीवर 😄. डबल चहा with क्रॅक जॅक..... धुरळाच ☕️. अजून रिटर्न चा ट्रॅक बाकी असल्याने हलक्यात नाश्ता उरकून घेतला... बरं का 😄. 

रिटर्न चा ट्रेक करताना हरणांचा कळप दिसला. बोपदेव घाट चा ट्रेक आणि हरणांच दर्शन आता नित्याचेच झाले आहे. 🦌

परत येताना मात्र उन्हामुळे सर्वांचीच  चांगलीच दमछाक झाली होती. उन्हामुळे लाही लाही झाली होती. बोपदेव घाट मध्ये परत आल्यानंतर मात्र नाष्टा करण्याच्या ऐवजी उसाचा रस पिण्याचे ठरवले.

आस्करवाडी जवळील एका उसाच्या घाण्यावर गाडी थांबवली आणि मस्त उसाचा रस घेतला. घाण्यावरील पाण्याच्या पाईप ने सर्वांनी जवळपास आंघोळ करून घेतली. 😄

घाण्याचा मालक तेथील कर्मचाऱ्याला म्हणाला तुला काय मदत करू का? तर तो म्हणतो कसा - या पोरांना अंघोळ घालायची आहे.  येता का? 😀😀😀😀

पाण्याने केलेली अंघोळ व उसाचा रस जणूकाही स्वर्गसुखचं... आ हा हा हा हा 🌾🌿 काय बोलूच नका राव....लय भारी!!!!!

आज मातृदिन....... निसर्गाचा आनंद...... कानिफनाथाचे दर्शन..... मित्रांबरोबर केलेली अफलातून मजा............आजचा दिवस आयुष्यभर संस्मरणीय राहील यात शंकाच नाही 🙏

      🌹 आपणा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🌹

चालत रहा 🏃🏃🏃🏃🏃🏃🏃
कानिफनाथ | Kanifnath Pune Trekking | कानिफनाथ | Kanifnath Pune Trekking | Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, May 08, 2022 Rating: 5

1 comment:

Powered by Blogger.