पुस्तक वाचन व आकलन : प्राणायाम रहस्य : श्री स्वामी बाबा रामदेव

कै. श्रीमंत बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित एक लाख पुस्तक वाचन व आकलन या उपक्रमात सहभाग घेतला.👍 

आयोजक श्री दिनेश देशमुख यांनी राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व आभार.🙏🌹🙏

 या उपक्रमा अंतर्गत  मी  स्वामी बाबा रामदेव लिखित * प्राणायाम रहस्य* ( वैज्ञानिक तथ्य सह  ) हे पुस्तक वाचून व समजून घेतले.

 सदर पुस्तकामध्ये प्राणायामचे प्रकार आणि त्याचे शरीराला होणारे फायदे हे वैज्ञानिक दृष्टीने समजावून सांगितले आहेत. गीतेतील बऱ्याच अध्यायांचे अर्थ समजावून सांगण्यात आले आहेत.

 पुस्तकामध्ये प्राणायाम च्या आठ संपूर्ण प्रक्रिया कशा आणि कोणत्या पद्धतीने करायच्या आहेत हे अगदी सविस्तर पद्धतीने सांगितले आहे.

योगाला फक्त एक व्यायाम म्हणून बघणं किंवा एखाद्या वर्गाची फक्त पूजा पाठ करण्याची एक पद्धत म्हणून बघणं संकुचित आणि अविवेकी दृष्टिकोन आहे.

योग व्यक्तिमत्वाला विराट बनवण्याची किंवा स्वतःला संपूर्णपणे रूपांतरित करण्याची आणि विकसित करण्याची अध्यात्मिक विद्या आहे.

योग केवळ शरीरातील रोगांचा नाश नाही तर मानसिक रोगांची चिकित्सा शास्त्र आहे.

माझा मित्र अभय मगदूम यांनी हे पुस्तक मला वाचण्यासाठी तीन चार महिन्यांपूर्वी दिले होते. आम्ही दोघे बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा करत असू आणि आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे याची चर्चा आम्ही नेहमी करत असतो. अभय मगदूम याने मला हे पुस्तक वाचण्यासाठी दिले त्याबद्दल त्याचे धन्यवाद. 🙏

दररोज व्यायाम करणाऱ्या अथवा प्राणायाम - योगासने करणाऱ्या लोकांनी  हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे. या पुस्तकांमध्ये दिलेले वैज्ञानिक दाखले खूपच उपयोगी आहेत. आपण करत असलेला योग बरोबर आहे की चुकीचा आहे  हे पुस्तक  वाचल्यानंतर समजून येते.

श्वसन क्रिया, ऑक्सिजनचे ज्वलन, मेंदूचे कार्य आणि प्राणायाम चा संबंध अतिशय सोप्या भाषेत या पुस्तकामध्ये समजावून सांगितलेला आहे.

श्री रामदेव बाबा लिखित हे पुस्तक समजण्यासाठी थोडसे कठीण पण योगाचा वापर करून आपले जीवन सर्वांग सुंदर बनवण्यासाठी मार्गदर्शन पर मात्र नक्कीच आहे. 🙏

सदर पुस्तक वाचल्यानंतर आपला प्राणायाम विषयी व योगासना विषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच जागृत होतो.👍

पुस्तक वाचन व आकलन : प्राणायाम रहस्य : श्री स्वामी बाबा रामदेव पुस्तक वाचन व आकलन : प्राणायाम रहस्य : श्री स्वामी बाबा रामदेव Reviewed by Vaibhav Kavade on Friday, August 19, 2022 Rating: 5

No comments:

Powered by Blogger.