कोणत्याही कामाची सुरुवात करायला सुरु केली की, सर्वप्रथम दोन व्यक्ती मनात थैमान घालतात. त्या व्यक्ती अक्षरशः व्यक्तीला नामोहरण करण्याचा प्रयत्न करतात.
आटपाडीतील बांधकामामुळे, माझी व्यायामाची सवय जवळपास बंद झाली होती. परवा तर मल्हारगड चा ट्रेक करून आल्यानंतर एक आठवडा झोपून होतो इतका आजारी पडलो.
Yes Yes कारण त्या दोन व्यक्तीचं. कोणत्याही कामाच्या सुरुवातीला अडथळा आणायची या दोन व्यक्तींना सवयच.
आज सोसायटी ते पुण्याचे ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर ट्रेकिंगला सुरुवात केली. साधारणपणे 11 ते 12 किलोमीटरचा हा टप्पा. कोंढवा पर्यंत या दोन व्यक्तीनी खूपचं विरोध केला.
एका पायात होता फरान. तो मला सारखं सांगत होता. " This is not your profession ". कशाला करतोय हे? काय उपयोग? आहे ही नोकरी शांतपणे कर. हा फरान माझा पाय पुढे टाकूनच देत नव्हतां.
दुसऱ्या पायात होता भित्रा राजू. जो मला भीती घालत होता. बारा किलोमीटर चालायला काय वेड लागलंय का? काय फायदा? या राजूने तर अक्षरशः भीतीने गार केलं.
निगेटिव्ह मेंटॅलिटी च्या फरान आणि राजूने तब्बल चार पाच किलोमीटर त्रास दिला. राजू आणि फरान एकमेकांबरोबर जोरात भांडत होती. मुख्य उद्दिष्टापासून दूर ढकलत होती.
राजू आणि फरान ची भांडणे चालू असताना, बघता बघता मनातील रैंचो Rancho जागा झाला. ह्या Rancho ने मनातील जागा काबीज करत असताना दोन्ही पायातील फरान आणि राजू यांना अक्षरशः धुडकावून बाजूला टाकलं आणि समजलं सुद्धा नाही बारा किलोमीटरचा ट्रॅक कधी पूर्ण झाला. 🏃
BMW Team @ पुण्याचे ग्रामदैवत श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर
Find Your Rancho Attitude 😊
Rancho 😊
Reviewed by Vaibhav Kavade
on
Sunday, October 02, 2022
Rating:
Very useful information and thanks
ReplyDeleteAgree
ReplyDelete