इक बगल मे चाँद होगा......

"दुखणं शरीर हे भविष्यातील प्रगतीला मारक असते" - सद्गगुरु

उजाडायला अजून अवधी असल्याने सोमेश्वर मंदिराच्या पायथ्याला थांबून थोडा व्यायाम करायचं ठरवलं. कोणत्याही परिस्थितीत उगवत्या सूर्याचे मनसोक्त दर्शन घेण्यासाठी आज आम्ही पहाटे 6 लाच  बोपदेव  घाटात पोहोचलो. अंधार खूपच होता, उजडायला अजून कालावधी होता.

 6:20 ला आम्ही ट्रेकची सुरुवात केली. दोनच दिवसापूर्वी शाकंभरी पौर्णिमा होऊन गेल्याने चंद्र प्रकाशमान होता. ज्या सूर्याचे दर्शन घेण्यासाठी आम्ही आलो होतो ते विसरून आम्ही चक्क चंद्राच्या प्रेमात पडलो.

ट्रेकच्या सुरुवातीला जवळपास  30 मिनिटे आम्ही चंद्राचं मनसोक्त दर्शन घेतले. चंद्राच्या त्या सुरेख रुपामध्ये मला तर साक्षात शाकंभरी देवीचे दर्शन होत असल्याचा भास होत होता. चंद्राचा शितल प्रकाश मनाला इतका आनंद देत होता की आज आम्ही सूर्योदय पाहायचंच विसरून गेलो. 

"आयुष्यातील रंगीबेरंगी स्वप्नांचा मुख्य स्त्रोत चंद्र तर ती स्वप्न साकारण्यासाठी प्रेरणा देतो तो म्हणजेच सूर्य"

घाटच्या डोंगरावरती पोहोचल्यानंतर आम्हाला आज श्री निलेश मोरे यांची भेट झाली. सुरुवातीला परिचय केल्यानंतर समजले की ते आसकरवाडीचे आहेत. ते नेहमी बोपदेव डोंगरावर ट्रेक साठी येतात. त्यांच्याबरोबर गप्पागोष्टी करत डोंगर उतरत असताना समजलं की, ते स्वतः पुण्यातील सुप्रसिद्ध मोरेशाही मिसळ या व्यवसायाचे मालक आहेत. त्यांच्याबरोबर बोलत असताना आम्हाला एक एक करत आश्चर्याचे धक्केच बसत गेले.

ते स्वतः आसकरवाडीचे रहिवासी तर आहेतच पण पुण्यातील सुप्रसिद्ध येवले चहा, वाय के वडेवाले, व्यंकटेश्वरा ग्रुप, ऑस्करवाडी ची मिसळ या व्यवसायांचे मालक सुद्धा आसकर वाडीचे रहिवासी आहेत.

श्री निलेश मोरे यांनी ट्रेक करत असताना आम्हाला 4/5 महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या -

1- आपल्या चालण्याच्या व्यायामामध्ये सातत्य पाहिजे. तेच सातत्य तुमच्या व्यवसायामध्ये त्याच अनुषंगाने उतरते.

2- चालताना मोबाईलचा वापर कमी करा. जीवनातील भावी नियोजनाचा विचार करत चला. याच विचाराने तुम्हाला जीवनातील नवीन मार्ग सापडतील.

3- चालताना हाताची हालचाल वाढवा. त्याने चालण्याची  गती वाढते. तीच गती तुमचे जीवन पुढे योग्य प्रकारे नेत राहील.

4- डोंगरदऱ्यात चालण्याचा व्यायाम करा. त्यामुळे हृदय मजबूत होईल. मजबूत हृदयामुळे  व्यवसायात धाडसी निर्णय घेण्याचे सामर्थ्य वाढेल.

5- निरोगी आरोग्य असेल तरच श्रीमंतीचा उपभोग व आनंद घेता येतो.

युवा उद्योजक श्री निलेश मोरे यांनी सांगितलेल्या या पाच गोष्टी आजच्या ट्रेक मधून आम्हाला प्रेरणा देऊन गेल्या. त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर आमच्या ट्रेकिंगचा ताण हलका झाला. एक उद्योजक कशाप्रकारे सोप्या पद्धतीने विचार करतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

आजच्या ट्रेकमध्ये आम्हाला दुसरा एक जिवाभावाचा  व्यक्ती भेटला तो म्हणजे दादा निमसे. ते स्वतः आर्मी मध्ये काम करत आहेत. दादा,  मी व प्रवीण आम्ही तिघांनी मस्त कपभर चहा घेतला आणि पुढच्या आठवड्यातील ट्रेकचे नियोजन करत घरी परतलो.

🙏🌹आजच्या चंद्राने मला जीवनातील पुढील स्वप्ने  दाखवली, तर श्री निलेश मोरे व दादा निमसे हे मात्र आज माझ्यासाठी प्रेरणादायी सूर्य होते 🙏🌹









इक बगल मे चाँद होगा...... इक बगल मे चाँद होगा...... Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, January 08, 2023 Rating: 5

2 comments:

  1. तुमच्या सोबत झालेला आजचा अनपेक्षित ट्रेक नक्कीच यादगर राहील...नक्कीच आपण पुन्हा भेटू एक नव्या विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी.....मला पहाटेचे मित्र खूप आवडतात...नक्कीच तुम्ही त्यात दुग्धशरकरा योगच म्हणावा लागेल...

    ReplyDelete

Powered by Blogger.