आज रंगपंचमी. चैत्र महिन्याची चाहूल आणि त्यात आज ढगाळ वातावरण. केंजळगडच्या दिशेने जाताना वातावरणा बरोबर मन सुद्धा आल्हादायक झालं होतं. निसर्गाच्या रंगात भिजण्यासाठी आतुर झालं होतं.
भोरला पोहचल्यानंतर आमच्या आवडीचा विठ्ठल चहा घेतला. चहा घेताना रायरेश्वर ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळाला.
सकाळी 8:30 च्या दरम्यान केंजळगडच्या पायथ्याला पोहचलो. गडाच्या पायथ्याला 15-20 कुटुंबे राहतात. 70 वर्षे वय झालेले आजोबा आमच्या स्वागतासाठी हजर झाले. त्यांनाचं आम्ही गाईड म्हूणन सोबत घेतेले.
गडाच्या पायाथ्याला गाडी लावत असताना दूरवरून विविध पक्षांचे मधुर आवाज कानी पडत होते. जणू काही आमचे स्वागतासाठीच !
केंजळगड हा सर्वसाधारण जेमतेम 1 तासाचा ट्रेक आहे. तर ट्रेकिंग प्रकार हा मध्यम स्वरूपाचा आहे. आज रंगपंचमी असल्याने ट्रेकिंगच्या सुरवातीलाच आम्ही एकमेकांना मनसोक्त रंग लावले आणि गडावर जाण्यासाठी निघालो.
गडावर जाणरी वाट ही छोटी आहे. वाटेवरील दगड धोंडे मागे सारत, निसर्ग न्याहाळात, गाईडच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गडावर पोहचलो.
केंजळगडचा आकार गांधी टोपी सारखा आहे. गडावर पोहताच कातळ दगडात कोरलेल्या पायऱ्या पाहून आपण आश्चर्यचकित होतो. कातळ दगडात 65 ते 70 पायऱ्या कोरलेल्या आहेत.
पायऱ्या चढून वर गेल्यावर आपण गडावर पोहचतो. सध्या हा गड भग्नाअवस्थेत आहे. गडावरील बांधकाम पडलेले आहे. गडावरील अवस्था पाहून मन हेलावले.
गडावर केंजळा आईचे मंदिर, 2 चुना घाणी, दारू गोळा ठेवण्याचे ठिकाण, पाण्याचे टाके ही पाहण्याची ठिकाणे आहेत.
गडावरून दिसणारा निसर्ग म्हणजे साक्षात स्वर्गच ! डाव्या बाजूला डोम धरण, कमळगड, वाईचा परिसर, महाबळेश्वर टोक तर उजव्या बाजूला रायरेश्वर व भोरचा परिसर. अप्रतिम निसर्ग सौंदर्य! गड फिरताना नक्की काळजी घेतली पाहिजे. गडावर फिरताना कडेला जास्त जावू नये. बरेच अपघात सुद्धा झाले आहेत.
गडावरील केंजळा आईला रितेशने नारळ फोडला. दिवा उदबत्ती केली. थोडा वेळ देवी समोर बसून आम्ही खावू खाल्ला.
खाताना गाईड बोलले - आज पर्यंत हजारो पर्यटक येतात आणि जातात पण गडावर देवीला नारळ, उदबत्ती करणारे खूपच कमी. आज रंगपंचमीला देवीला रंग लावणारे माझ्या आयष्यातील पहिले तुम्हीच. आज तुमच्या रंगाने देवी छान दिसते आहे बघा.
केंजळा आई ही सत्व पाहणारी आहे. तुमच्या ट्रेकिंग - पर्यटन, आणि विचारात सत्व आहे म्हूणनच आज सणाच्या दिवशी तुम्ही इथे रंगपंचमीसाठी देवी समोर आला आहात. तुमच्या अडी - अडचणीच्या वेळी देवी तुमच्या बाजूने उभी राहणार.
एकमेकांनां पुन्हा रंग लावत व गाईडच्या पाया पडून आम्ही गडाचा निरोप घेतला.
खरं तर आज रंगपंचमीला केंजळगडाने आम्हांला निसर्ग रंगात भिजवून काढले.
केंजळगड ट्रेक पूर्ण करुन आम्ही रायरेश्वर दर्शन - डोम धरण - सिद्धेश्वर मंदिर, डोम, नरसिंह मंदिर, डोम - वाईचा महागणंपती - मांढरदेवी दर्शन असा टप्पा पूर्ण केला.
आज रंगपंचमीच्या दिवशी निसर्गाच्या रंगाने ,महागणपती व मांढरदेवीच्या दर्शनाने आमचे मन अनुभवाने आणि आठवणीने रंगबेरंगी बनून गेले व चैत्र महिन्याप्रमाने आल्हादायक बनून गेले.🏃
रंगांचा खरा अर्थ म्हणजे आपल्या मनाचे- जीवनाचे सत्व. जे आम्हाला आजच्या ट्रेक ने शिकवले. 🙏
चालत रहा
व्यायाम, प्रेरणा आणि जीवन
निसर्ग रंगात चिंब भिजवणारा "केंजळगड" | Kenjalgad Fort Trekking | चालत रहा
Reviewed by Vaibhav Kavade
on
Monday, March 13, 2023
Rating:
छान
ReplyDeleteKhup mstt
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteमस्त झालाय की ट्रेक. देवी नक्कीच मदतीला धावून येणार 😊
ReplyDeleteमाझ गाव या गडाच्या पायथ्याशी आहे.मला पण थोडी भीती वाटते हा गड चढायला पण मित्र कसे बसे जातात वर घेऊन.
ReplyDelete