सिंहगड इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ - करियरची दिशा दाखवणारे "आदरणीय एस. एन. नवले सर"

2004 साली सिंहगड कोंढावा कॅम्पसला नोकरीला लागल्यानंतर मी आदरणीय एस. एन. नवले सर यांच्या संपर्कात आलो आणि माझ्या करियरला नवी दिशा मिळाली.  एस. एन. नवले सर हे सिंहगडचे संस्थापक व अध्यक्ष श्री. मारुती नवले यांचे मोठे बंधू होतं.

आदरणीय एस. एन. नवले सरांन मुळे माझी पुण्यात कोंढावा कॅम्पस मध्ये हॉस्टेला राहण्याची मोफत सोय झाली. त्यावेळी 500 पेक्षा जास्त computer आणि कोंढावा कॅम्पस मधील IT इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळण्याची संधी मला सिंहगडमुळे मिळाली.

सिंहगड व नवले बंधूंमुळेच माझ्या IT मधील करियरची पायाभरणी झाली. 2004 ते 2007 या  सिंहगड मधील नोकरी काळात  आदरणीय एस. एन. नवले सर यांनी त्यावेळी खूप मार्गदर्शन केले. पुण्यात असा मोठा वडीलधारा व्यक्ती करियरच्या सुरवातीला  व्यक्ती भेटणं हे माझं भाग्यच. 🙏

नुकतेच आदरणीय एस. एन. नवले सर  देवा घरी गेले. 🥲

माझे सिंहगड मधील मित्र व सहकारी  श्री अतुल नगरकर यांनी आदरणीय एस. एन. नवले सर यांना श्रद्धांजली म्हणून लिहिलेला लेख -

Respected S.N. sir,

आदरणीय प्रोफेसर एस.एन. नवले सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

सिंहगड इन्स्टिट्यूट चे आधारस्तंभ असलेले आमचे एस. एन. सर आज देवाघरी गेले हे ऐकून खूप दुःख झाले.

सरांच्या सहवासात दहा वर्षांहून अधिक काळ राहिल्यामुळे एक राजा माणूस आज आमच्यातून निघून गेल्याची भावना आहे. मी सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये जेव्हा जॉबला लागलो तेव्हा पहिल्याच भेटीत खांद्यावर हात ठेवून मोठा आधार देणारे ते माझे आधारस्तंभ होते.

कोंढवा कॅम्पसच्या खुप आठवणी आहेत. मला सिंहगड ज्युनिअर कॉलेज चा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जॉब पण त्यांनीच दिला होता. एवढेच नव्हे तर सुरुवातीला जॉब लागला तेव्हा मला रेक्टर हे पद देखील दिले म्हणजेच अर्थातच माझ्या राहण्याची सोय करून दिली.

सहा महिन्यापूर्वीच त्यांना भेटून त्यांची विचारपूस केली बारा वर्षांपूर्वी वर्तमानपत्रामध्ये एक  लेख लिहीत असताना,  त्यामध्ये  एक कबीरचा दोहा घ्यायचा होता पण सरांना त्यातील काहीच शब्द आठवत होते, आणि ते शब्द होते..
............. बहुरी करोगे कब l  

खरंतर हा दोहा अतिशय सोपा होता,
परंतु कबीराचे अन्य दोहे मी शोधत बसलो, सरांच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे हा माझा अट्टाहास होता, एक दिवशी मी माझ्या गाडीत प्रवास करत असताना सचिन पिळगावकर च्या अँखियों के झरोखे से पिक्चर मधील एका गाण्यामध्ये कबीराचे काही दोहे ऐकण्यासाठी मिळाले. त्यामध्ये सरांच्या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले. आवर्जून सरांकडे गेलो त्यावेळी सरांची तब्येत थोडी खालावलेली होती तरी देखील मी त्यांना जवळ बसून सर्व आठवण करून दिली, आज तो दोहा पूर्ण झालेला होता आणि मी त्यांना सांगत होतो,

'कल करे सो आज कर, आज करे सो अब l
 पल मे प्रलय हो जायेगा, बहुरी करोगे कबIl'

त्यांना मी म्हणून दाखवल्यावर ते दिलखुलास हसले, आणि हातात हात देऊन दिलखुलास दाद दिली.

सिंहगड सारख्या खूप मोठ्या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून कधीही माणसांसोबत रुबाबात नाही वागले अतिशय साधेपणाने सादगी पूर्ण नातेसंबंध जपणारे आमचे सर, अगदी त्यांच्या घरी गेल्यानंतर स्वतः पाणी आणून द्यायचे, किती हे मोठेपण! "अतिथी देवो भव" हे काय असते ते मी त्यांच्याकडून शिकलो.

सिंहगड संस्थेचे अध्यक्ष त्यांचे छोटे बंधू आदरणीय एम. एन. नवले सरांच्या प्रत्येक वाढदिवसाला वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्यावर एक सुंदर लेख लिहून ते त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायचे विचार SN सरांचे असायचे अक्षर माझं, अशा मोठ्या व्यक्तीमत्वांबरोबर काम करताना खूप मजा येते आणि शिकायला मिळते, सर तुमच्याविषयी किती लिहू? आणि कसं लिहू? आज तुमच्याविषयी हे सर्व लिहिणं थोडं अवघडच आहे...हाच खरा आज पडलेला प्रश्न आहे, सरांचे सर्व कुटुंब म्हणजे आमच्या आदरणीय विजया नवले मॅडम या प्राचार्य असताना त्यांच्या हाताखाली तसेच प्रत्यक्ष एस. एन. नवले सरांच्या हाताखाली मी प्राध्यापक म्हणून काम केले, तो सर्व अनुभव खूप आनंदी अनुभव होते, त्यांची कन्या स्नेहल ही माझी अकरावी बारावीची विद्यार्थिनी होती. सर्व कुटुंबाने मला इतके प्रेम दिले मी ते केव्हाही विसरू शकत नाही.

आज मात्र सर तुम्ही आमच्यात नाही हे मनाला पटत नाही, इथून पुढे तुमच्या शिवाय राहाव लागणार आहे, आपणास इथूनच नमस्कार करतो सर! आदरणीय कै. एस. एन. सरांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना.‌ 
सर, भावपूर्ण श्रद्धांजली!

कळावे,
अतुल नगरकर

आयुष्य घडवताना आपले कष्ट महत्वाचे असतातच पण त्याहूनही महत्वाचे असतात थोरा मोठ्यांचे आशीर्वाद. त्या आशीर्वादांच्या जोरावरच आपण पुढील वाटचाल करत  असतो.

मला व नगरकर सरांना आमच्या सुरुवातीच्या काळात आदरणीय एस. एन,. नवले सरांचे मार्गदर्शन रुपी आशीर्वाद मिळाले. याहून मोठं अजून काय हवं?

🙏 आदरणीय एस. एन. नवले सरांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

चालत रहा
व्यायाम, प्रेरणा आणि जीवन 

सिंहगड इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ - करियरची दिशा दाखवणारे "आदरणीय एस. एन. नवले सर" सिंहगड इन्स्टिट्यूटचे आधारस्तंभ - करियरची दिशा दाखवणारे "आदरणीय एस. एन. नवले सर" Reviewed by Vaibhav Kavade on Tuesday, March 21, 2023 Rating: 5

1 comment:

  1. खूपच सुंदर शब्दांजलीच्या स्वरूपात भावपूर्ण आदरांजली वैभव सर आपले ब्लॉगच्या माध्यमातून हे सर्व समाजापर्यंत पोहोचत आहे आपल्या पुढील कार्यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete

Powered by Blogger.