छोटा मावळा : श्रवण सकळे | सिंहगड ट्रेक | Sinhagad Fort Trek

साधारणतः आठ वर्षांपूर्वी म्हणजे 2015 ला मी ट्रेकिंग ची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळामध्ये सोसायटी व मित्र परिवारातून कोणीच ट्रेकिंगला येत नसल्यामुळे मी एकटाच सिंहगड ट्रेक करण्यासाठी पहाटे 5 ला जायचो. 

मध्यंतरीच्या कोरोना काळामध्ये चालणे, व्यायाम व ट्रेकिंग या शरीराला व मनाला आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा विसर पडला होता. सन 2022 मध्ये पुन्हा एकदा टीम आमच्या सोसायटी मधील टीम बीएमडब्ल्यू आणि चालत रहा ग्रुपच्या माध्यमातून मी नव्या जोमाने ट्रेकिंग ची सुरुवात केली आणि त्याची सुरुवात झाली ती  दिवे घाटाजवळ असलेल्या मल्हार गडापासून. 

पूर्वीपासून ट्रेकिंग हा माझा सर्वात जास्त आवडीचा विषय.  ट्रेकिंग साठी दोन गोष्टी महत्वाच्या, पहिली वेळ आणि दुसरी संयम. तासनं तास चालण्याची, नवीन परिसर पाहण्याची आणि इतिहास समजून घेण्याची आवड लागते.

ट्रेकिंग करणारा माणूस हा स्वतःसाठी वेळ काढतो आणि स्वतःच्या योजना आकांक्षा इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःचा आनंद शोधत असतो.  

मी प्रशांत सकळे. मूळचा नांद्रे- सांगलीचा. सध्या नोकरी निमित्त पुण्याला राहतो. माझा ट्रेकिंगचा छंद माझ्या मुलाला देखील लागावा यासाठी त्याच्या लहानपणापासूनच मी त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल,  गड किल्ल्यांची माहिती, मावळ्यांच्या शौर्य गाथा  मी श्रवणला सांगत असतो. कालांतराणे या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर त्याला त्या पाहण्याची, इतिहास पाहण्याची, तो जाणून घेण्याची खूप इच्छा होत होती.

माझ्या मोबाईल मधील काही जुने ट्रेकचे फोटो पाहून त्याला गड किल्ल्यांबद्दल कधी आकर्षण निर्माण झाले हे मला समजले नाही. साधारणता जानेवारीच्या 21 तारखेला योग जुळुन आला आणि छोटासा गड ट्रेक साठी निवडला तो म्हणजे मल्हार गड. 

सकाळी आठ वाजता ट्रेक चालू केला आणि तासाभराच्या अंतराने आम्ही गडावरती पोहोचलो.  त्याला देखील तो अनुभव पहिल्यांदाच होता. त्याने संपूर्ण गड नीट बगितला. त्यावेळी त्याच्या चौकस बुद्धीने मला हैराण करून सोडले. बाबा हे बुरुज म्हणजे काय?  कशासाठी ठेवले आहे? किती लोक राहत होते?  छत्रपती शिवाजी महाराज येत होते का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे देता देता मल्हारगड कधी फिरून झाला हे आम्हाला कळालच नाही.

मल्हार गडावरून परत येत असताना त्याला मी सिंहगड बद्दल सांगत होतो आणि सिंहगड नाव ऐकल्याबरोबर त्याचा पुढचा रिप्लाय आला की बाबा आपण कधी जायचं?  त्याला बोललो की बाळा सिंहगड खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी खूप वेळ लागतो 

तो बोलला,  मी चालेल बाबा!! 👍🏃

त्यानंतर मी ठरवले की मी त्याला घेऊन जाईल पण त्याचं वय पाहता माझ्या धाडस होत नव्हतं. बऱ्याच दिवसानंतर काल माझ्या मनात विचार आला की शनिवार रविवार सुट्टी देखील आहे. सिंहगडला जाण्यासाठी योग्य दिवस आहे.

कालच पाऊस पडून गेला होता. वातावरणात गारवा होता. माझी इच्छा माझ्या मित्रांना बोलून दाखवली ते बोलले की श्रवण थोडा छोटा आहे कशाला प्लान करताय, त्यांची काळजी योग्य होती, शाळा पण चालू आहे. पण माझं मन खात होतं. पण मी ठरवलं की जायचं. आमच्या डॉक्टर दाजींना कॉल केला त्यांना माझा हा प्लान सांगितला त्यांनी त्वरित रिप्लाय दिला की घेऊन जा. लहान मुले काटक असतात आणि ती चालत असतात. त्यांच्या या वाक्याने माझा आत्मविश्वास वाढला आणि मी ठरवलं की उद्या काही झालं तरी त्याला घेऊन जायचं. रात्री दहा वाजता मला कीर्तीचा कॉल आला आणि आम्ही सिंहगड ट्रेकिंगचा प्लॅन केला.

सकाळी सव्वा सात वाजता आम्ही ट्रेक चालू केला, आणि आश्चर्य वाटेल सुरुवातीपासूनच श्रावणच्या चालण्याचा वेग आमच्या दोघांच्या चालण्याइतपत होता.

चालत रहा आणि बीएमडब्ल्यू ग्रुपच्या माध्यमातून दररोज दहा हजार पावले चालण्याची सवय आहे त्याच्यामुळे यावेळी सिंहगडचा ट्रेक करत असताना दम लागत नव्हता. पण माझी काळजी मात्र श्रवण बद्दल होती की त्याला जमेल का?  तो जाईल का?  पण सुरुवातीपासूनच त्याला पुणे दरवाज्याला पोहोचण्याची ओढ लागली होती. 

संपूर्ण ट्रेकिंगच्या दरम्यान आम्ही चार ते पाच वेळा थांबला असेल त्याचं लक्ष फक्त एकच होतं की पुणे दरवाजाला पोहोचायचं.  प्रत्येक वेळी तो मागवून बघायचा बाबा आपण किती वर आलेला आहे आता काहीच दिसत नाहीये.

श्रवणला वाटेत अनेक ट्रेकर्स भेटले. त्यांनी त्याचं कौतुक देखील केले, कित्येकांनी खाऊ  दिला. साधारणता पावणे नऊ वाजता आम्ही पुणे दरवाजाला पोहोचलो. तसे पाहता पाच ते सहा वेळा थांबण्याचा वेळ वजा केला तर श्रवने त्याचा आयुष्यातील पहिला सिंहगड ट्रेक माझ्यासोबत एका तासांमध्येच पूर्ण केला. 

गडावरती पोहोचल्यानंतर त्याला संपूर्ण गड फिरून पाहायचा होता परंतु आम्ही  ठराविकच पॉईंट केले.  तानाजी मालुसरे समाधी, घोड्यांची पागाची जागा अशी मोजकेच ठिकाणी मी त्याला दाखवले आणि त्याला त्यानंतर आम्ही गडावरच्या भजी भाकरी दही ताव मारला. साधारणता बारा वाजता आम्ही परतीचा प्रवास चालू केला.

आजच्या ट्रेकने आम्हाला काय शिकवले - 

जीवनामध्ये तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आणि तुमची इच्छा असली तर ती गोष्ट सध्या करण्यासाठी प्रयत्न महत्वाचे आहेत. काळजी, भीती याचा आधीच विचार न करता त्या गोष्टीला सामोरे जा आणि ठरवलेली गोष्ट पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करा.

आज श्रवणने सुरवातीला एक- दोन किलोमीटर ट्रेक कम्प्लीट केला.  तो लहान आहे पण त्याचे ट्रेक पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न आज वाखानण्यासारखे होते.

आजच्या ट्रेकमुळे माझा त्याच्याबद्दलचा आत्मविश्वास हा वाढलेला आहे. मला असं वाटतंय की आजच्या युगामध्ये एखाद्या तरी असे चांगले व्यसन आपल्या मुलांना लावावेच.

गर्व आहे मला त्याचा. प्राऊड फादर!!!

आपल्या सर्वांचा छोटा मावळा.... श्रवण सकळे 🙏🏃

श्रवणने आज त्याचा पहिला सिंहगड ट्रेक एक तास 30 मिनिटांमध्ये पूर्ण केला. 

चालत रहा!!!!






छोटा मावळा : श्रवण सकळे | सिंहगड ट्रेक | Sinhagad Fort Trek छोटा मावळा : श्रवण सकळे | सिंहगड ट्रेक | Sinhagad Fort Trek Reviewed by Vaibhav Kavade on Saturday, April 08, 2023 Rating: 5

15 comments:

  1. Khup chan ......asech pratek palakani apalya mulana Chatrapati shivaji Maharaj yanchyabaddal lahan pana pasun mahiti dyavi ani itihasabaddal tyanchya manat utsukta nirman karavi.. ani bhavi pidhila jagruk karave......proud of both of you my brother and chota mavala Shravan

    ReplyDelete
  2. Great Prashant!!, you are trying to build a better society.

    ReplyDelete
  3. Mastch shravan keep it up👍👍

    ReplyDelete
  4. Keep it up champ God bless you

    ReplyDelete
  5. Great Dad ….! Great Champ…..Keep it up Shravan…. I am motivated with this blog and story of Dad & Champ..

    ReplyDelete
  6. Great my brother Prashant and Chota Mavala (Shravan) and best of luck for your future trecking plan

    ReplyDelete
  7. लेख वाचून मस्त वाटल...आतिशय सुंदर लेख लिहलायस... अस वाटल आता माझ्या मुलाला पण तुझ्या जवळ ठेवावं ...पुढच्या ट्रेकिंगसाठी श्रवण ला देवा अंकल कडून खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  8. अतिशय सुंदर लेख लिहलायस... तुझ लेख वाचून...अस वाटल माझ्या मुलाला पण तुझ्यासोबत पाठवावं...पुढच्या ट्रेकिंगसाठी श्रवण ला देवा अंकल कडून खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  9. Fantastic 👍👍👍👍

    ReplyDelete
  10. अतिशय सुंदर लेख लिहलायस... तुझ लेख वाचून...अस वाटल माझ्या मुलाला पण तुझ्यासोबत पाठवावं...पुढच्या ट्रेकिंगसाठी श्रवण ला देवा अंकल कडून खूप खूप शुभेच्छा...

    ReplyDelete
  11. Great experience 👌🏻... I am also shocked ...at this age it's toughest thing to do. But his eagerness and willingness to know the past is unbelievable.🙌🏻.. I already knew that in every activity he is always active to complete the tast whatever it takes 😇👌🏻proud of you bhache 😘❤️🙌🏻 जय शिवराय 🚩

    ReplyDelete
  12. Great experience 👌🏻... I am also shocked ...at this age it's toughest thing to do. But his eagerness and willingness to know the past is unbelievable.🙌🏻.. I already knew that in every activity he is always active to complete the tast whatever it takes 😇👌🏻proud of you bhache 😘❤️🙌🏻 जय शिवराय 🚩

    ReplyDelete
  13. Match Shravan, ani kharch khup chan vatal baba ni aaplya pila la ek mast oodhh lavli ahe...

    ReplyDelete
  14. Great Prashant , Bharich bhawa.
    You are the you want to see in the world.

    ReplyDelete

Powered by Blogger.