नमस्कार मंडळी 🙏 कस काय हाय ? पावसाळा सुरू झालाय. काय बाहेर फिरायचं नियोजन बियोजन केलं की न्हाय? आमी तर यावेळी धमाल नियोजन घडवून आणलं बघा. काय ईचारूच नका बगा.
आमचं कसं असतंय बघा, कुठल्या पण ट्रेकची सुरवात म्हटलं की पहिला देव दर्शनाने. अहो ते आमचं कायमचं गणितच ठरलेलं असतंय. जिथं जीत गडावर गेलूया तिथल्या देवाच भक्त आम्ही. आणि आमच्या लोकांना ते देव पावल्यात पण. लय निस्सीम भक्त हाय आम्ही गडावरच्या देवांचं.
यंदा पावसाच्या सुरुवातीला जेजुरीला गेलो नव्ह. म्हटलं पावसाळ्यात ट्रेकिंग करायच्या अगोदर खंडोबाचं पाय धरून येऊ. म्हणजे कसं पुढचं ट्रेक एकदम निवांत होणार हो... गॅरेंटेड...फुल कॉन्फिडन्स हाय ... अहो कॉन्फिडन्स असल्याशिवाय आम्ही बाहेरच पडत न्हाय. लय डोकं लावतुया बगा.
मागल्या आठवड्यात लय धुवाधार पाऊस झाला बघा पुण्यात. आता म्हटलं कुठं तरी जायलाच लागते. पाय नुसतं येड्यागत करायला लागल्याल बगा. इकडे जा की तिकडे जाऊ. शेवटी प्लॅन केलाच की पुरंदरचा.
पुरंदरचा गड कसा आमच्या सोसायटी पासून फकस्त 30 किलोमीटर. ये गेलो आणि ये आलो...
इतवारी सकाळी सकाळी साला निघालो बघा पावसातच. बाप-देवाचे दर्शन घेतलं अनं पुढे निघालो. त्या कोडीतच्या पुढ आल्यानंतर पुरंदर लागला की दिसायला. इतकं जाम धुकं होतं ना काय विचारूच नका. म्हणलं लय मजा येणार गड्या.
परत म्हटलं गड्या पुरंदरला जाताना रोडवरन जायला लागणार.. रोडवरन चालत गेल्यावर मजा येणार का डोंगरात गेल्यावर मजा येणार? सगळी सुरात बोलली, लगा डोंगरातच गेले पाहिजे.
अहो!!!सांगतो काय तुम्हाला ऑन द स्पॉट प्लॅन चेंज केला न्हवं. पुरंदर कॅन्सल केला आणि नारायणपूरच्या समोरच्या डोंगरावर जायचं ठरवलं.
अहो डोंगर लय कमी लोकांना माहिती आहे. नारायणपूर मंदिराच्या समोर उभा राहिले की उजव्या साईडला दिसतोय बघा.. हा तोवच तोवच .. सूर्यपर्वत ♥️
दिसायला छोटा दिसतोय बघा पण लय घाम काढतुया. तोय इम्रान पहिल्यांदाच आलेलं.. इतकं चालल की झोपलच ती. पार दमून वैतागून गेल.
डोंगरावर गेल्यावर जाम धुकं होतं बघा.... तसलं धुकं बघून संदीप तर जाम येडं झालं. मिनी उटी मिनी उटी करून नाचायलां लागलं. गडी फोटोत पण चिकना दिसत होता आज. आमच्या ग्रुपचा शाहरुखच आहे तेव्ह. आम्ही आपलं नुसतं त्याच्या माग माग.
तुम्हाला सांगतो असला डोंगर हाय ना... त्या गुहागाटीला पण जायची गरज न्हाय. काय डोंगर काय झाडी... विचारूच नका. हॉटेल बिटल काय नाय बर का. ह्या डोंगरावर अस्सल देशी झाडं पाहायला मिळाली बगा. देशी हळद, जंगली मशरूम, तीन पायाचा निवडुंग, पाच पाड्याचा निवडुंग असली एकापेक्षा एक देशी झाड होती बघा. हीच झाडं शहरांमधी 1000 ला विकत्यात शोपीस म्हणून.
तुम्हाला सांगतो डोंगरावर कानिफनाथाच मंदिर हाय. मंदिराजवळ पोचल की डबल एनर्जी येतीय बगा. पोरं तर नाचायलाच लागली. कानिफनाथाचे दर्शन घेऊन, निसर्ग बघून पोरं जाम खुश. ते संदीप तर अजून फुटूच काढत होत.
सूर्यपर्वत म्हणजे सूर्यपर्वतच. ♥️
डोंगरावरून खाली उतरताना असली मजा आली बर का काय विचारूच नका. आव पावसाला सुरुवात झाली आणि घसरायला लागली की आम्ही सगळे. चिखलात राडे राड.
डोंगराच्या वाटेने घसरगुंडीसारखे घसरत आलो बघा. हसून हसून पोट दुखायला लागली. खरं सांगतुया.. अंगाला चिखल लागला ना बरं वाटतं बगा. लहानपणी शाळा सुटल्यावर घरी जाताना आडवड्यात अश्याच मजा पावसाळ्यात करायचो. जुने दिवस आठवलं.
तासाभरानं खाली आलू. कपड्याचं काय विचारूच नका. अंगा खांद्यावर नुसता चिखलच. तिथेच एक छोटं भैरवनाथाचे मंदिर हाय. त्याच पण दर्शन घेतलं. दिल खुश झाल बघा ♥️
घसरगुंडीचा व्हिडिओ पण इतका हिट झालं ना. जी ती ईचारायला लागलं कुठ गेलतासा कुठ गेलतासा ?
चिखलात तितका राडाराडा झालेला बगा. लोक बघून हसायला लागली आमच्याकड. शेवटी बादलीभर पाणी घेतलं अन कसं बस हात पाय धुतलं.
बोपदेव घाटातील त्या चहा वाल्याने विचारलं, कुठे गेलतास काय करून आलाय सा. आव तुम्हाला सांगतो त्या बापदेव घाटातील आम्हाला सगळी ओळखत्यात. चाच खातच आहे हो तिथं.
आजच्या ट्रेक मध्ये चालणं कमी अनं घसरगुंडीत जास्त झाली. पण बाबांनो तुम्हाला सांगतो - ही सह्याद्रीतली घसरगुंडी हाय. इथं माणूस घसरत नाय. उलट आयुष्यात उंच बघायला आणि उंच उडायला शिकवतूया. ही ताकत हाय आपल्या सह्याद्रीची. 🙏
तुम्हाला बी असली मजा पाहिजे असेल तर...तुम्ही फकस्त एक काम करा........
बाहेर पडा....वाट शोधा.....आणि चालत रहा 🏃
टीम BMW @ सूर्यपर्वत, नारायणपूर. पुणे
घसरगुंडी डॉट कॉम
Reviewed by Vaibhav Kavade
on
Tuesday, July 11, 2023
Rating:
Ekaddum zakas. Lai bhari👌👌👍
ReplyDeleteVery nice 👍👍, keep going all the best and enjoy!!
ReplyDeleteकाटा किर्र लिवलंय बगा 👌
ReplyDeleteलय भारी....👌👌
ReplyDelete👌🏻👌🏻 लय भारी भावड्या
ReplyDeleteMastach bhawa
ReplyDeleteLove to see, how you enjoy your life. Keep it up
ReplyDeleteMastch 😍😍👌👌 keep trekking 👍
ReplyDelete