आज बोपदेव घाट माथा पार करून आंबील ढग यशस्वीरित्या पूर्ण केला. पुण्यातील आंबील ओढ्याचा उगम ज्या बोपदेव घाटातील डोंगरतून होतो तो " आंबील ढग " या नावाने स्थनिक भाषेत ओळखला जातो.
आता तुम्ही म्हणाल , हे काय इथेच तर आहे त्यात काय यशस्वी? ..पण मित्रांनो खरा कस लागला आज ! तीन डोंगर चढून -उतरून आज आंबील ढग पूर्ण केला. आंबील ढग म्हणजे मिनी अंधारबनचं आहे. जंगल.... झाडी.... ओढे... आणि पाऊस.
नेहमीप्रमाणे बोपदेव माची पासून सुरुवात केली, साधारण साडेसहा वाजता ..to be precise सात वाजता. सकाळी 6 लाच एक मावशी सीताफळ विकायला आली होती. तीच व्यवसायाचे टाईमिंग मानलं. सकाळी 7 वाजयच्या आताच तिने 100-200 रुपयेची सीताफळ विकली होती. सकाळी घाटात येणाऱ्या लोकांनी तिच्याकडून सीताफळ घेतेली.
ट्रेकिंगच्या सुरवातीलाच किलोभर सीताफळं आम्ही फस्त केली. एवढ्या सकाळी सीताफळ खायची आमची पहिलीच वेळ. पण अगदीच मोकळ्या पोटी असल्यामुळे खूपच आधार दिला सीताफळाणी. 20-25 मिनिटांनी डोंगरातील हनुमान मंदिरा जवळ आलो.
BMW ग्रुपचीअत्यंत निगुतीने जपली जाणारी प्रथा म्हणजे नारळ वाढविणे. गणेशने नारळ वाढविला आणि पुढे सुरु झाला प्रवास आंबील ढगच्या दिशेने.
पहिला हिरड्याचा डोंगर गप्पा गोष्टी करत पार झाला आणि तो उतरून दुसरा डोंगर ..पण तो उतरताना मात्र मुख्य पायवाट हरवल्या सारखं वाटलं. पण आम्ही न थांबता रस्ता सावधगिरीने पहायचं ठरवलं. मागच्या trek चे अनुभव पाठीशी असल्यामुळे हिशोबी जोखीम घ्यायची ठरवली आणि मग खरी मजा सुरू झाली. इथे एक गोष्ट शिकलो. चालत राहायचं घाबरायच नाहीच पण courage+common sense=निखळ निसर्गप्रेम!
पुढे एके ठिकाणी पायवाट नक्की कुठे मिळेल ते ठरत नव्हतं.मग सगळ्यांनी एकमुखाने म्हणालो चला रे गड्यांनो हा खडा डोंगर पार करू आंबील ढगचा..संपूर्ण आत्मविश्वास आणि शरीराची कसोटी लागली ना राव ! पण दोस्त हो माथ्या वर पोहचल्यावर उसळता, गार वारा अंगावर आला आणि कुणीतरी आपलीच पाठ थोपटत आहे असं वाटलं.
अर्धा तास आंबील ढगच्या माथ्यावर होतो. माथ्यावरून पुण्याचा मस्त नजारा दिसत होता. माथ्यावरून खेड शिवापूर - कात्रज घाट - पुणे शहर - उंड्री - पिसोली आणि बोपदेव घाट चा परिसर स्पष्ट दिसत होता. निसर्गाने पांघरलेली हिरवी शाल पाहून आम्हाला आलेले त्राण केव्हाच निघून गेला होता. पोटात काहीच नसतानां अंगात मात्र ऊर्जेचा प्रचंड स्रोत वाहत होता.
आंबील ढग उतरताना समजलं अनुभव किती महत्त्वाचा असतो. जो डोंगर चढताना अवाढव्य- कठीण आणि बलाढ्य वाटत होता उतरताना मात्र सहज आणि सोपा वाटत होता. अगदी हसत खेळत मजा करत खाली उतरलो. तासाभराच्या परतीच्या प्रवासानंतर साडेअकराच्या सुमारास बोपदेव माची जवळ पोहोचलो. आज आम्ही आंबील ढग सर करण्यासाठी जवळपास सलग चार तास चाललो. न थकता....न घाबरता... न माघार घेता........
प्रगतीच्या वाटेवरून चालताना वाईट अनुभव सोडून द्यायचे असतात तर नवीन शिकण्याची गरज असतेच शिवाय ते अनिवार्य सुद्धा असते. ( atomic habits पुस्तकामधून )
पूर्वीच्या ट्रेक मधून आत्तापर्यंत आलेले सर्व वाईट अनुभव आंबील ओढ्यामध्ये आम्ही स्वाहा केले. चांगल्या - शिकण्याजोग्या अनुभवाची शिदोरी सोबत घेत.. मारुतीरायाचा आशीर्वाद घेत आनंदी मनाने घरी परतलो.♥️
चालत रहा.....
आंबील ढग
Reviewed by Vaibhav Kavade
on
Monday, August 14, 2023
Rating:
*बोपदेव घाट मधील अतिशय कठीण श्रेणी असलेला हिल टॉप म्हणजेच *आंबीलढग* आज टीम बीएमडब्ल्यू व चालत रहा ग्रुपने सर केला 🏃♂️🏃♂️🏃♂️🚩🚩
ReplyDeleteभारी 👌
ReplyDeleteAlways positive attitude…👍
ReplyDelete