कानिफनाथची परिक्रमा

असं म्हणतात की,  एके ठिकाणची जाऊन येण्यासाठी काही विशिष्ट हेतू अदृश्यरित्या काम करत असतो. आपण पुन्हा त्या स्थळी परत ठरवून जातो अथवा आपल्या नकळत आपण  त्याठिकाणी दुसऱ्या मार्गाने पोहोचत असतो आणि हे सर्व होता होता स्वतः आपण एका आश्चर्याचा भाग झालेला असतो...आज काहीसं हेच झालं!

मी साधारण दोन वर्षांपूर्वी कानिफनाथला आमच्या जुन्या मित्रांसोबत दोनदा फुरसुंगी मार्गे कानिफनाथ येथे छोटा ट्रेक केला होता. तिथे नेहमी येणाऱ्या मित्राने मला एक फीडबॅक दिला की माझा वॉकिंग स्पीड चांगला आहे पण श्वासांवर काम केलं पाहिजे ! दोन वर्ष उलटून गेली. मधल्या काळात बरंच काही झालं.

Team BMW आणि चालत रहा ग्रुप सोबत आवडीचे रूपांतर सातत्य येण्यात झाली. आम्ही सर्वांनी लहान मोठे बरेच ट्रेक केले. आज माझ्या मोठ्या 7 वर्षांच्या मुलीला ओवीला घेऊन पुन्हा कानिफनाथला निघालो होळकरवाडी मार्गे. अर्थात, अजून दोन मित्रांचे देखील छोटे दोस्त तिच्या बरोबर होतेच. साधारण तासाभरात गडावर पोहचलो.

दोन वर्ष पूर्वी कानीफनाथला मागे येऊन गेलो होतो त्याच्या आठवणी तरळत होत्या. कानिफनाथ महाराजांचे मनोभावे दर्शना झाल्यावर गडावरची जगप्रसिद्ध भेळ यथेच्छ खाल्ली.

पुढे निघालो, पाहतो तर तो जुना मित्र पुन्हा मंदिराच्या पायऱ्या वर भेटला. आता सध्या कुठे? काय करतोस? कसं चालू आहे? वगैरे अश्या गप्पा चालू असताना त्याने तुझा श्वासोश्वास पूर्वी पेक्षा चांगलाच सुधरल्याचे सांगितले. Well Done! Keep It Up! बोलून त्याने मला शाब्बासकी व प्रेरणा दिली.

परतीच्या मार्गात विचार करताना हा निव्वळ योग नाही हे एव्हाना लक्षात आले! माझ्या शारीरिक क्षमते वर म्हणजे श्वासावर आपसूकच काम झाले होते. दोन वर्षापूर्वी मी इथे धापा टाकत आलो होतो आणि आज एकदम फिट होऊन सोबत माझ्या मुली सोबत. माझ्याही नकळत माझी आरोग्य विषयक महत्वाकांक्षा कानीफनाथ महाराजांनी माझ्याकडून दोन वर्षात पूर्ण करुन घेतली. अर्थातच प्रत्येक शनिवार - रविवारी आमच्या ग्रुप सोबत ट्रेकिंग करण्याची चांगली सातत्य पूर्ण सवय मला इथे कामी आली. आणि त्या सवयीच फळ चागल्या आरोग्यच्या स्वरूपात कानिफनाथ मंदिरातच मिळालं. ♥️

सवयीमध्ये सातत्य असले की, चांगली सवय ही नेहमी आपल्याला विशिष्ट अश्या ध्येयापर्यंत घेऊन जाते. ✅️

गणेश कुलकर्णी
चालत रहा 🏃



कानिफनाथची परिक्रमा कानिफनाथची परिक्रमा Reviewed by Vaibhav Kavade on Sunday, August 27, 2023 Rating: 5

3 comments:

  1. Adhere to good qualities always .best of luck for your future journey

    ReplyDelete
  2. Continous efforts paid off!

    ReplyDelete

Powered by Blogger.