दिशा दाखवनारा बोपदेव घाट

पटेल सर दोन दिवसापासून पुण्यामध्ये आहेत हे कळाल्यानंतर  मन अस्वस्थ व बेचैन झाले होते. कधी एकदा सरांना भेटतोय आणि आपल्या  गप्पागोष्टी करतोय असे मनामध्ये वाटत होतं.

सायंकाळी सरांचा फोन आला. प्रवीण मी तुझ्याकडे रात्री येणार आहे व सकाळी लवकर तुझ्या इथूनच  वडगावला निघणार आहे. सर येणार म्हणल्यानंतर उत्सुकता व आनंद गगनात मावेना.

रात्री सोसायटी गेटपर्यंत चार वेळा जाऊन आलो. सर आत्ता येतील मग येतील, तोपर्यंत सरांचा फोन आला. मी ऑन द वे आहे थोडा वेळ लागेल.

रात्री साडेअकरा पर्यंत सर घरी पोहोचले व सरांच्या स्वागतासाठी मी गेटवर उभा होतो, सरांची गाडी पार्क केली व वरती घरी आलो आणि मग सुरू झाल्या गप्पा इकडच्या तिकडच्या😇. घरातले सर्वजण झोपी गेल्यानंतर सुद्धा माझी व सरांची  चर्चा काय संपेना. रात्रीचे सव्वा एक वाजले तरी पण चर्चा सुरूच होती. ( आपली जुनी विद्यापीठातली व रूम वरची सवय. ) 
             
सरांनी ठरवले उद्या सकाळी साडेसहा वाजता बोपदेव घाटात जायचं आणि काय आहे ते एकदा बोपदेव घाट मला बघायचाच आहे मी हसत हसत सरांना म्हणलो सर नक्की जाऊया सकाळी.
        
ठरल्याप्रमाणे आम्ही दोघेही बोपदेव घाटात सकाळी पावणे सात वाजता पोहोचलो व ट्रेकिंगची सुरुवात महादेवाचे दर्शन घेऊन केली. बोपदेव घाटातील हिरवळ जसजसं पुढे जाऊ तसतसं निसर्ग आम्हाला जणू बोलवतच होता आणि मन प्रसन्न करणारं वातावरण सरांनी बोपदेव घाटात अनुभवलं. जरा पुढे चालत गेल्यानंतर  पक्षांचा आवाज व किलबिलाट (Sound Therapy) तसेच मोर पळत असताना डोळ्यांना अलगदपणे दिसले.
       
उजवीकडे नजर फिरवल्यानंतर भला मोठा *हिरडा डोंगर* त्याच्याच बाजूला *काळुआईचा डोंगर* व पलीकडील बाजूस *आंबील ढग* दिमाखात आकाश पांघरून घेतल्यासारखा दिसत होता  त्यानंतर सरांनी व मी मारुतीरायाचे दर्शन घेऊन, पुढच्या वेळेस *हिरडाडोंगर* ट्रैक करू असाा निश्चय करून‌ परतीचा मार्ग  धरला.

 आज सरांच्या बरोबर ट्रेक मधुन काय शिकलो.

1.आरोग्य व व्यायाम हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे.

2.आयुष्यामध्ये कोणताही निश्चय केला तर पूर्ण करण्यासाठी आपले सर्वस्वी प्रयत्न करणे आणि उमेदीच्या काळातच उद्दिष्ट साध्य करणे.

3.आपल्या व मुलांच्या तब्येतीवर व त्यांच्यावरील संस्कार यावर प्रामुख्याने भर दिला पाहिजे. 

4.आयुष्यामध्ये जर आपण एकटे चालत राहिलो तर कधीच दूरचा  रस्ता गाठू शकत नाही. त्यामुळे नेहमी आपल्या  टीम सोबत राहणे व सर्वांना सोबत घेऊन जाणे. तरच आपण दूरवरचा रस्ता सहजपणे पार करू शकतो.

5.चालत राहण्या बरोबर, बोलत राहा, हसत राहा, नवनवीन गोष्टी शिकत रहा, शक्य तितकी मदत करत रहा.

प्रवीण पाटील
चालत रहा 🏃♥️
दिशा दाखवनारा बोपदेव घाट दिशा दाखवनारा बोपदेव घाट Reviewed by Vaibhav Kavade on Friday, September 22, 2023 Rating: 5

1 comment:

  1. आयुष्यातील दिशादर्शक म्हणजेच बोपदेव घाट

    ReplyDelete

Powered by Blogger.