नसानसात विजयाचा हुंकार भरणारा - तिकोना

सह्याद्री... आयुष्यात नेहमी नाविण्याची कास धरायला लावतो.

नुकतात आम्ही 2024 मधील पाहिला ट्रेक कमळगड  पूर्ण केल्यानंतर आपसूकच दुसऱ्या ट्रेकची तयारी सुरू झाली. 🏃

कमळगडा हा तसा अवघड ट्रेक असल्यामुळे भरपूर दमछाक झाली होती. त्यामुळे दुसरा ट्रेक हा छोटासा पण सुंदर असावा असे सर्वांचे मत झाले. मग माझी बुद्धी सह्याद्रीचा वेध घेऊ लागली आणि आम्ही निवड केली ती तिकोना किल्ल्याची.

तिकोना हा पवना मावळचा राखणदार. अतिशय सुंदर, मोहक किल्ला. संपूर्ण परिसर हा सह्याद्री पर्वतरांगांनी व्यापलेला. तिकोना किल्लावर जाण्याकरीता तिकोना पेठ येथे जावे लागते. ठरल्याप्रमाणे रविवारी सकाळी साडेपाच वाजता आम्ही तिकोना किल्ल्याकडे प्रस्थान केले. बरोबर साडेआठ वाजता तिकोनापेठ या किल्ल्याच्या पायथ्याच्या गावापासून ट्रेकला सुरुवात केली.

तिकोना पेठ येथून निघणारी वाट गडाच्या पहिल्या टोकाला म्हणजे मेट येथे पोहोचते. मेट म्हणजे सिक्युरिटी चेकची जागा. गडावरती येणारी व्यक्ती कशा करता आलेली आहे त्याच्याकडे परवाना आहे का नाही किंवा इतर सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेली पहिली तपासणीची जागा किंवा गडावर होणारा हल्ला परतवून लावण्याचे पहिले ठिकाण.

मेटपर्यंत वाट थोडी अवघड आहे. मेट नंतर गडाचा पहिला दरवाजा लागतो  नंतर आपल्याला चपटदान मारुती यांचे दर्शन होते. अतिशय सुंदर मोहक आणि पायाखाली लंकिन राक्षसीन घेतलेला सुंदर असा आठ ते दहा फुटाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. असं म्हणतात की पूर्वी येथे सुंदर मंदिर होते तरीही सध्या गडकोट संवर्धन समितीने चांगले मंदिर उभारण्याचे काम चालू आहे.
प्रत्येकवेळी आमच्याकडून गडावरच्या देवस्थानाला नारळ वाढण्यात येतो. गडाला फुले वाहण्यात येतात. आम्ही मारुतीला नारळ व्हायला. मारुतीरायाचे दर्शन घेतल्यानंतर मारुतीरायाची मुद्रा डोळ्यामध्ये स्पष्टपणे उमटते आणि एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा मनामध्ये संचारते. मारुतीरायाच्या दर्शनाने आमच्या नसानसात विजयाचा हुंकार चढला. अंगात बळ चढलं.. स्फूरण चढलं.
तसा हा ट्रेक आमच्यासाठी सोपा पण भरपूर अनुभव देणारा होता. वाटेवरती चुन्याचा घाणा, श्रीरामाचे मंदिर लागते, मंदिरा शेजारी पाण्याचे टाके आहे. चारी दरवाजे पार करून आम्ही गडाच्या मुख्य बालेकिल्ल्यावर प्रवेश केला. आम्ही सहकारी मजल दरमजल करत, सह्याद्रीच्या सौंदर्याचा आनंद लुटत, सहयाद्रीच शौर्य समजून उमजून घेत गडावर पोहोचलो होतो.

बालेकिल्ल्यावर  वितंडेश्वर - त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. मंदिराखाली धान्याची कोठार किंवा पाण्याची टाकी असावी असा अंदाज आहे. देवाचे दर्शन घेऊन आम्ही बालेकिल्ल्याचा संपूर्ण परिसर पाहिला. बालेकिल्ल्यावरून बारा मावळ प्रांताचा अतिशय मोहक सौंदर्य दर्शन आपल्याला पाहायला मिळते.

बालेकिल्ल्यावरील भगव्या ध्वजाला मानवंदना देऊन आम्ही परतीचा प्रवास चालू केला. दिसताना खूप अवघड आणि उंचीचा किल्ला चालून आल्यानंतर मात्र खूप छोटासा वाटतो. येथे महाराजांचे वाक्याचे प्रचिती येते विचार मोठा असला की भला मोठा डोंगर सुद्धा मातीचा गोळा वाटतो.

गड उतरताना मात्र काहीतरी राहिल्याचा भास हा मला होत होत. आजून फिरायला पाहिजे असं वाटायला लागलं. त्यातच आमचे सहकारी मित्र गणेश कुलकर्णी यांनी एक संकल्पना बोलून दाखवली की आता आज अजून एक ट्रेक करता येतो का पाहूया.

तिकोना शेजारी लोहगड, तुंग, विसापूर, जवळ आहे. तसे लोहगड आणि विसापूर शेजारीच असल्याने व तुंग आणि तिकोना हे एकत्र येत असल्याने आम्ही तुंग याची निवड केली. आमच्या सर्वांचा उत्साह हा उसंडून वाहत होता या उत्साहामध्ये कधी एकदा दुसरा ट्रेक चालू करतो असे वाटत होते.

तिकोना ट्रेक संपल्यानंतर घरी येऊन आराम केला असता पण सर्वांचे मन सह्याद्रीतून काही निघत नव्हते. खरंतर आयुष्यात असंच आहे ना एखाद्या गोष्टीची ओढ लागली की काळ वेळ तहानभूक हरपून जाते आणि मग त्या गोष्टीत आपण स्वतःला झोकून देतो.तिकोना आणि तुंग अशा ट्रेक आज आम्ही एकाच दिवशी पूर्ण केला.

आजच्या ट्रेक मधून आम्ही काय शिकलो. जीवनाच्या प्रवासामध्ये कधी सोपे, कधी अवघड असे प्रसंग येत राहतील राहतील. अनुभवाची शिदोरी पाठीशी असल्यावर सोपा मार्ग आणखीन सोपा होतो आणि अवघड मार्गावर आपला आत्मविश्वास हा जागा होतो.

ह्याच आत्मविश्वासाच्या जोरावर कधी कधी न जमणाऱ्या गोष्टीही सहज जमून जातात म्हणून ज्या गोष्टीची सर्वाधिक भीती असते ती गोष्ट सर्वात आधी करावी जिंकलो तर नवा इतिहास आणि हरलो तर अनुभवाची शिदोरी जी की पुढच्या प्रवासाला प्रेरणादायी असेल धन्यवाद.


चालत रहा! 🏃

लेखन - प्रशांत सकळे

सहकारी - गणेश कुलकर्णी, प्रवीण पाटील, संदीप सुंटी, प्रशांत सकळे, गणेश कुलकर्णी, देवेंद्र पाचोरे, शितल पाटील, सचिन पाचोरे
नसानसात विजयाचा हुंकार भरणारा - तिकोना नसानसात विजयाचा हुंकार भरणारा - तिकोना Reviewed by Vaibhav Kavade on Friday, February 09, 2024 Rating: 5

5 comments:

  1. प्रिय मित्रा प्रशांत तुझा व तुझाया सहकार्यांचा हा छंद खुपच प्रेरणादायी आहे.ह्या प्रवासा मुळे तुझा लेकणीचा पैलू आज आमच्या समोर आला.तुझा लेकणीतून तुमच्या प्रवासचे चित्र प्रत्येक्षात डोळ्या समोर उभे राहते. ❤️❤️❤️👏👏👏

    ReplyDelete
  2. 👍 शिकवण तर भारीच 👌👌

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलं आहे . तुमचा हा ट्रेकिंगचा छंद बघून आम्हाला पण प्रेरणा मिळत आहे आम्ही पण असे प्लान करून ट्रेकला जावं ही इच्छा मनात निर्माण होते.. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. Very nicely explained as in all blogs. The information about all the infrastructure at the fort is very informative. It will help those who want to visit this fort. Keep informing us.

    ReplyDelete

Powered by Blogger.