तिला जाऊन दहा बारा वर्ष झाली आता ती जागा तशीच ओसाड पडुन आहे.तिथल्या वातावरणातला जिवंतपणा तिच्या सोबत निघुन गेलाय. उरली आहे ती फक्त हि उन वारा झेलत तोडकी मोडकी झोपडी .
पायथा आणि सिध्दगड माची ह्यांच्या बरोबर मधेच काकडमाळावर हि झोपडी अगदी थोड्या उंच ढुब्यावरच तीच्या अंगणात एक गुलमोहराच झाड आणि बाजुला लिंबाच आणि पेरूच झाड त्याला लागुनच एक भाताचा पेंढा रचण्यासाठी कुंभेर केलेली असे.खालच्या बाजुला चार पाच मोठी शेत, शेताच्या खालुन दमदम्या डोंगरातून आलेला ओहोळ खळखळ करून वाहत असे आणि तोच पुढे जाऊन सुपधार धबधब्याला मिळत असे.एका बाजुला साखरमाची चे कातळकडे तर समोर बेलाग सिध्दगड. थोडस डोळसपणे पाहिल्यावर सिध्दगडमाची च्या पोटात वसावी अशीच ती दिसे.चार हि बाजुला रान आणि उंचच उंच झाडे पक्षाचा किलबिलाट तर कानावर कायम धडका देत असे. एखादी पांधरी शुभ्र गाय झाडाखाली बसत असे आणि तीच वासरू तीच्या जवळबसुन दुध पीत असे , एखाद वासरू इकडे तिकडे उड्या घेत, बाकी गाई गुरे चरत काहि रवत करीत बसत एखादा रगीट बैल ओहळावर पाणी पेऊन हंबरडा फोडी
इकडून तिकडून चहु बाजुने फक्त गार गार वाराच सुटे आणि अगदीच कस सगळ मंगलमय वाटे पाहूनच कोण्यातरी अद्भूत जागेवर आल्याची जाणीव होई. आणि अशाच ह्या वातावरणात ह्या निसर्गाच आस्वाद घेत गावातली एक आजी इथे राहत तीला आम्ही बय म्हणत गावात घर होत पण तीच मन तिथेच रमत ती तिथेच निवास करी . फक्त उन्हाळ्यात मात्र ती गाई गुरे घेऊन गावात येऊन राहत.
आम्ही मज्जा म्हणून दिवसभर काकडमाळावर जात तिथल्या हवेत एक वेगळीच जादु होती. गेल्यावर एकदम मोकळ मोकळ वाटु लागे .
आम्ही मज्जा म्हणून पाटाच पाणी वळवायच निमित्त देऊन सिध्दगडाच्या घाटापर्यत जात असु कधी ओहळाणे पार वर पर्यंत जात. त्या ओहाळाच्या डबक्यातले मासे पाहत पाहत हिंडुन झाल्यावर पुन्हा बय च्या झोपडीकडे जात आणि पाटाच पाणी वळवल असे सांगत तीला सगळ माहीत असे पण ती खोटी खोटी शब्बासकी देत आणि आम्हाला जेवायला देई . त्या छोट्याच्या झोपडीत तिने सगळा संसार मांडला होता त्यातच ती सगळे गाई गुरे राहत . संपुर्ण झोपडी मधे दुधाच आणि तुपाच ,दह्याचा गंध दरवळे ती आम्हाला तेच जेवु घालत. मग आम्ही तिथेच खेळ खेळुन उन्हाडक्या करून संध्याकाळी घरी जात ती परत आमच्या येण्याची वाट बघत.
लेखन : जितेंद्र उदय ढगे. +91 8625934741
@ सिद्धगड
सिद्धगडावरील झोपडी ♥️
Reviewed by Vaibhav Kavade
on
Thursday, July 18, 2024
Rating:
✒️ मस्त भावा✌️
ReplyDelete