28 डिसेंबरला दुपारी तीन साडे तीनच्या आसपास सोसायटी मधील मित्र परिवाराचा निरोप घेउन मुंबईच्या दिशेने सहकुटुंब निघालो. 29 डिसेंबरच्या पहाटे 2 वाजता आमची Memphis (मेम्फिस ) या अमेरिकेमधील ऐतिहासिक शहरात जाण्यासाठी फ्लाईंट होती.
तासाभरात लोणावळा घाट पास केला आणि एक मोठं टेन्शन निघून गेलं. लोणावळा घाट मध्ये ट्राफिक मध्ये अडकून कित्येक लोकांच्या फ्लाईंट चुकतात असा अनुभव मित्र इम्रान जमादारने अगोदरच मला सांगून सावध केल होतं. जेवढ्या लवकर निघता येईल आणि लवकरात लवकर कमीत कमी 5/6तास अगोदर पोहचा वाटल्यास मुंबईत जाऊन काहीही करा, पण मुंबईत लवकर पोहचा. इम्रान ने सांगितलेला सल्ला आम्ही मनावर घेतलाच होता.
लोणावळा सोडल्यावर निवांत चहा पाण्यासाठी थांबलो.साधारण 5 वाजताच आम्ही लोणावळा सोडल.आता मुंबई फक्त तास दोन तासाच्या अंतरावर राहिली होती.म्हणजे आम्ही अगदी योग्य वेळेत पोहचत होतो.
आमच्यासाठी हा नुसता मुंबईचा प्रवास नव्हता. तर आमच्या 18 वर्ष IT मधील संघर्षचा हा प्रवास आणि त्यातील हा आजचा प्रवास म्हणजे संघर्षाच फळच होतं. मुंबईला जाताना खास करून मला माझ्या शिक्षकांची आठवण आली त्यामध्ये प्रामुख्याने सौ उमा कोरे, जोग सर, H. R जोशी सर, किणीकर सर, मित्र दिपक पाटील यांची आठवण आली.
सर्वानी जेवण करून आम्ही साधारणपणे संध्याकाळी 7/8 वाजता मुंबई विमानतळावर पोहचलो. आयुष्यात पहिल्यादाच आम्ही विमानतळ पाहत होतो. काव्या वरद तर जाम खुश होते. मी आणि मयुरी आनंदी पण डोक्यात पुढंच टेन्शन घोळत होत.जावू का व्यवस्थित? होईल का नीट अमेरिकेत? असे असंख्य प्रश्न डोक्यात येते जातं होते. इतक्यात फ्लाईत दोन तास उशीरा आहे असं समजलं. म्हणजे पहाटे चार वाजता. आता आजून टेन्शन पुढची फ्लाईंट चुकणार नाही नां याच?
साधारणेपणे पहाटे 1 च्या आसपास आम्ही सर्व नातेवाईकं,आई,वडील, बहीण, दाजी Dr. प्रशांत यांचा निरोप आशीर्वाद घेऊन बोर्डिंग साठीची प्रक्रिया सुरु केली. तासाभरात सर्व प्रक्रिया पूर्ण करून आमच्या टर्मिनल जवळ येऊन थांबलो. बाहेर फ्रांस एअरलाईनचे पॅरिसला जाणार विमान उभे होते. बरोबर 3:30 वाजता विमानात बसलो. आणि पहाटे चार लां विमान झेपावलं.
विमानात सर्वाधिक खूष वरद काव्या. त्या दोघांनी अक्षरशः विमानाच्या आतील प्रत्येक भाग पाहून घेतला अगदी कॉकपीट मध्ये सुद्धा जाऊन वैमानिकला भेटून आले.
पॅरिसला जाण्याच्या संपूर्ण प्रवासात वरद काव्या झोपलेच नाहीत. पॅरिस मधील वेळेनुसार सकाळी 7 ला आम्ही पॅरिसमध्ये पोहचलो. दुरून पॅरिस मधील आयफेल टॉवर दिसत होता. पॅरिस मधील विमानतळ इतका मोठा की एका टर्मिनल वरून दुसऱ्या टर्मिनल जाण्यासाठी ट्रेन आहेत. ट्रेन मधून आम्ही दुसऱ्या टर्मिनलवर गेलो तिथं आमचं अमेरिकेत अटलांटाला जाण्यासाठीच विमान आमची वाट पाहत होतं. आता मात्र अमेरिकेत जाण्याच्या विमानात वेगळे चेहरे पट्टी असलेली लोकं दिसायला लागले. आता मात्र लाक्षत आलं आपण आता नव्या जगात प्रवेश करत आहोत. पॅरिसच्या विमानात भरपूर भारतीय लोकं होते त्यामुळे काही वाटल नव्हतं.
अटलांटाच्या प्रवासात वरद काव्याने विमानातील भरपूर भाग माहिती करून घेतला अगदी टॉयलेट सुद्धा कसं काम करते हे पाहण्यासाठी वरद आठ दहा वेळा आत जाऊन सगळी बटण माहिती करून आला. विमानातील मनोरंजणाची साधन आणि ति कशी वापरायची याची तर इत्यभूत माहिती अक्षरशः वरद काव्याने पाठ केली.
अटलांटा हा अमेरिकेतिल सर्वात मोठा विमानतळ तर जगातील सर्वात व्यस्त विमानतळ. भारतात जसे सायकल स्टॅन्ड वर सायकली उभा असतात अगदी त्याप्रमाने त्याहून जास्त या विमानतळावर विमान उभी असतात. उड्डाणं घेण्यासाठी विमान रांगेत उभी असतात. एका पाठोपाठ एक अशी विमान इथं उड्डाणं घेत असतात.
अटलांटाचा विमानतळ पाहून अक्षरशः डोळे दिपले. याच विमानतळ वर आमचा इमिग्रेशनइंटरव्हिव्ह झाला आणि आम्ही कवडे परिवार अमेरिकेत दाखल झाल्याची नोंद ऑफीशियल आली. त्यानंतर Memphis (मेम्फिस ) या मिसिसिपी नदीच्या तिरावर वसलेल्या शहरात जाण्याचा विमान प्रवसाचा अखेरचा अंतिम तिसरा टप्पा चालू झाला.
अटलांटा ते मेम्फिस फक्त दोन अडीच तासाचा विमान प्रवास करून आम्ही मेम्फिस या आमच्या मुख्य ठिकाणी आलो. आता इथं मात्र गर्दी कमी होती. रात्रीचे आठ नऊ वाजले असावेत. मेम्फिस विमानतळ बाहेर सर्व बॅगा घेउन आलो आणि हॉटेल वर जाण्यासाठी गाडीचा शोध सुरु झाला. इतिहास-भूगोलात वाचल होते अमेरिकेत हाड गोठवणारी थंडी असते, आता मात्र मी स्वतः ती अनुभवत होतो. इतक्या थंडीने माझं डोकं दुखायला लागलं. कसा बसा एक जण हॉटेलला सोडायला तयार झाला. सहा फूट उंचीचा तो धीप्पाड माणूस, गाडीत सिगारेटचा वास आणि भयाण अंधारत आम्ही हॉटेलकडे जाण्यासाठी निघालो. 25 मैल प्रवासासाठी सुमारे 70$ लागले म्हणजे जवळपास 6000 रुपये. त्याच वेळी अमेरिका म्हणजे किती श्रीमंत देश असावा याची कल्पना आली.
हॉटेलवर पोहचलो. इतक्या थंडीत बॅगा वर खाली करताना माझ्या नाकीनऊ आले. पण माझी दररोज व्यायाम करण्याची सवय मला इथं कमी आली. त्यामुळे मला जास्त त्रास झाला नाही. बॅगा वर घेयून जातं असताना समोरून एक मुलगा आला.त्यानं विचारलं महाराष्ट्र मधून का? मराठी कानावर आलं अन आमचा जीव भांड्यात पडला. चला कोणीतरी आपलं भेटलं !
16 हजार किलोमीटरचा प्रवास कसा झाला? अशी कोणती शक्ती होती जीने आम्हाला सुखरूप पोहचवल. कोणतीही अडचण येऊ दिली नाही. असं आम्ही काय केल म्हूणन आम्हाला ही इतकी मोठी संधी आणि अमेरिका पाहण्याची संधी कुटुंबासोबत मिळाली. तेही कंपनी कडून कोणतीही अपेक्षा न ठेवता. अशी कोणती शक्ती आपल्या मागे असावी? असा विचार मनात येते असताना बॅग ओपन केली अन त्याच बॅगेत ठेवलेली ज्ञानेश्वरी सर्वात पहिला अमेरिकत हाती लागावी का.
अन त्याच क्षणापासून माझा प्रवास सुरु झाला. त्या शक्तीचा शोध घेण्याचा जीन माझा समृद्ध जीवन प्रवास घडवून आणला. कृष्णाकाठापासून ते मिसिसीपीच्या तिरापर्यंतचा तोही व्हाया खडीमशीन मार्गे ❤️🏃♂️
![]() |
USA Dream Ticket |
![]() |
Mumbai to Paris |
![]() |
Mumbai to Paris |
![]() |
Varad Enjoying Food |
![]() |
![]() |
Kavya Enjoying Food |
![]() |
Kavya-Varad with Cabin Crew |
![]() |
Kavya Varad in Paris Train |

No comments: