अमेरिकेतील त्या कडाक्याच्या थंडीत हॉटेल मध्ये उतरल्यावर सर्वात पहिला पोटा पाण्याची सोय काय हे शोधायला सुरु केलं. बॅगेतून भडंग, स्नॅक, गूळ -तीळ पोळ्या काढल्या. रात्री 9 च्या आसपास जेवण केल. थोड्या वेळानंतर रूम मध्ये थंडी वाजायला लागली. हॉटेल मध्ये हिटर होता पण तो कसा चालू करतात आणि कोणतं तापमान सेट केल पाहिजे हे काही समजेना. कारण अमेरिकेत फॅरेनाईट तर आपल्याकडे सेलसियस मध्ये तापमान मोजतात. इथंच पहिला धढा मिळाला अमेरिका वेगळ्या पद्धतीने विचार करते आणि गोष्टी निर्माण करते. शेवटी कसा बसा हिटर चालू केला आणि आम्ही झोपी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी 6 लाच जाग आली. रूमच्या बाहेर आलो. बाहेरच वातावरण पाहून अक्षरशः वेडा झालो. इतका सुंदर निसर्ग, स्वच्छ आकाश, हिरवी गार झाडं, स्वच्छ रस्ते, टुमदार घरे. इतका सुंदर आणि स्वच्छ निसर्ग भारतात फक्त कोरोना काळातच मला पहायला मिळाला होता. अमेरिका अतिशय स्वच्छ आहे. रूमच्या बाहेर येऊन घरातल्यानां फोन लावला. आमचं हॉटेल, निसर्ग दाखवला. आम्ही सुखरूप असल्याच कळवलं. Thanks to technology. पूर्वी ज्यावेळी व्हाट्सअप नव्हतं त्यावेळी अमेरिकेत आलेल्या लोकांना असे विडिओ कॉल करणे शकय नसायचं. आता technology ने सर्व काही सोपं केल आहे. मस्त मध्ये हॉटेल मध्ये नाश्ता केला तोही अमेरिकनं पद्धतीचा. काही केल्या जातं नव्हता पण आता काही इलाज नव्हता. सकाळी 11 नंतर मात्र आमचं आजच्या दिवशीच महत्वाचे काम चालू झालं. अमेरिकेत घर भाड्याने घेणे.
भारतातून येताना महेश सरांन बरोबर बोलणं झालं होते. ते आम्हाला त्यांचे चालू घर आम्हाला देणार होते आणि ते दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जणार होते. 31 डिसेंबर रोजी आम्हाला भेटण्यासाठी आणि घराची चावी देण्यासाठी अटलांटावरून आले. आम्हाला ते घरी घेयून आले. घरातील सर्व माहिती सांगितली. घरातील इन्स्ट्रुमेंट कशी वापरायची याची माहिती दिली. इंटरनेट कसं घ्यायच, पत्र कुठं येतात, गॅस पाणी कनेकशन कसं घ्यायचं याची सगळी माहिती दिली. आता विषय निघाला महत्वाचा पैशाचा. मी बोललॊ सर या महिन्याच घर भाडं कसं आणि किती द्यायचे? कारण आमचे बँक अकाउंट नव्हतं. पहिल्या पगार तर आजून दूरच. कंपनी ने दिलेले 3800 डॉलर एवढेच सोबत.घर तर मस्तच पण मनातून भीती होती पैशाच कसं करायचे. एवढ्या पैशात कसं भागवायचं? आजून पगाराला महिना बाकी आहे.
इतक्यात ते बोलले. पैशाच काही टेन्शन घेयू नका. चालू जानेवारी महिन्याच भाडं मी भरलं आहे. Light पाणी बिल सुद्धा भरलं आहे.ही चावी घ्या. उद्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावर घरात या आणि तुम्ही निवांत सेटल झाला की मला थोडे थोडे पैसे द्या. आम्ही आश्चर्यचकित झालो. अशी मानस अमेरिकेत सुद्धा भेटू शकतात. ना फारशी ओळख तरीही जवळपास 2 लाखाची मदत. जाता जाता ते सहज बोलून गेले. पैसे काय अमेरिकेत भरपूर आहे. कमावलं तेवढं कमी. आपण आपलं चांगलं योग्यागत वागत राहायचं काहीच कमी पडत नाही.
आता मला मात्र दलाई लामा यांचे seven years in Tibet या चित्रपटातील एक वाकय आठवले "ह्या जगातील कोणत्याही प्रवाशाला प्रवासात कोणतीही अडचण येणार नाही. त्याच्या प्रवासातील सगळ्या अडचणी हा बुद्धच सोडवेल" त्यांच्या या वाक्याचा अनुभव आता मात्र मी स्वतः घेत होतो 🙏❤️ चालत रहा

No comments: