अमेरिकेत आलेले सत्य अनुभव. ..... माझ्या बायकोच्या कंपनीत उच्च पदावर काम करणारा, गर्भ श्रीमंत, उच्च, समाजात मोठा मान सन्मान असलेला, अनुभवी आणि कायम नवीन विचारांच्या मागे धावत ते साध्य करण्याचा प्रयत्न करणारा असा ब्रायन.
त्या दिवशी कंपनीत एक ऑडिट रिपोर्टचे काम असल्याने फॅक्टरी मध्ये लवकर जायचे होते. आमच्याकडे गाडी नसल्याने त्या दिवशी ब्रायन मयुरीला घेण्यासाठी आला. किती वाजता माहितेय? पहाटे साडे पाचला. अमेरिकन लोकं कामाच्या बाबतीत खूप शिस्तबद्ध. वेळ अगदी काटेकोर पाळणार. एक मिनिट मागे पुढं करणार नाहीत. म्हणूनच की काय हा देश जगावर राज्य करत असावा असं माझं प्रामाणिक मत.
मयुरीला सोडायला मी लिझिंग ऑफिस पर्यंत गेलो होतो. ब्रायन ने माझ्या हातात हात दिला. काय कसं चालू आहे ? विचारलं. दोन तीन मिनिटे गप्पा झाल्या आणि ते दोघे ऑफिसला निघाले.
त्या दिवशी ब्रायनने स्वतःचे खान पान यावर मयुरी ला माहिती सांगितली, जी तीने मला ऑफिस वरून आल्यावर सांगितली, जी ऐकून मीही आश्चर्य चकित झालो. मयुरी आणि मी आम्ही दोघे याविषयावर जवळपास तासभर चर्चा केली. काय हे अमेरिकेन लोकं विचार करतात. त्याच्या कृती मागे किती मोठा विचार असतो स्वतः बद्दल, देशाबद्दल.
ब्रायन हा आठवड्यातील दोन दिवस जेवत नाही. शनिवारी व रविवार. अगदी पाणी ही मोजून पितो. आता तुम्ही म्हणाल ह्यात काय विशेष ते कोणीही करू शकतो. पण हे असं दोन दिवस उपाशी राहण्यामागचे कारण काय? त्याचे हे कारण ऐकून मात्र आम्ही विचारमग्न झालो होतो.
ब्रायन ला विचारलं का? असं दोन दिवस पूर्ण उपाशी का? ब्रायनने या मागची तीन कारणे सांगितली ती अशी-
1. तब्बेत-दीर्घायुष्य
दोन दिवस उपवास कारण्यामागे प्रमुख कारण तब्बेत,उत्तम शरीर आणि दीर्घायुष्य होण्यासाठी.
आज माझ्याकडे जी लाखो डॉलरची संपत्ती आहे, ती उपभोगायची असले तर मला माझं शरीर उत्तम राखल पाहिजे. आनंदी राहील पाहिजे. उपवास केल्याने मी माझं शरीर अधिक जास्त काम करत. मला अधिक आनंद मिळतो. शरीराला नको असलेली घाण बाहेर पडते. ताजतवान वाटायला लागतं. पूर्वी पेक्षा अधिक ऊर्जा मिळते.
2. भावनांवर नियंत्रण
मी पोटावर म्हणजे माझ्या खाण्यावर नियंत्रण ठेवू शकतो म्हणजे मी माझ्या भावनांवर नियंत्रण / काबू करू शकतो. हे नियंत्रण मला share बाजार, नोकरीत, व्यवसायात निर्णय घ्यायला मदत करत. भावनेच्या भरात मी निर्णय घेत नाही. शांत, योग्य विचार, सल्ला घेयून मी निर्णय घेतो. पूर्वी मी हे मला जमत नव्हतं. पण जसा मी उपवास करायला सुरवात केली तस माझ्याकडे माझ्या भावनेवर नियंत्रण, संयम ठेवण्यास शिकलो. आणि हे सगळं आपसूक घडलं.
3 संकटाची तयारी
अमेरिकेत वातावरण कोणत्याही क्षणी बदलत. कधीही पाऊस, वादळे येतात. अचानक आलेल्या वादळामुळे वीज कधीही जावू शकते. अश्या वेळी एकदोन दिवस वीज नसल्यास घरातील सगळी उपकरणे बंद. अगदी गॅस सुद्धा. अश्या नैसर्गिक संकटात मी माझ्या उपवास करण्याच्या पद्धतीने वेळ निभावू शकतो. नुसत्या पाण्यावर मी एक दोन दिवस काढू शकतो. अश्या पद्धतीने मी नैसर्गिक संकटाला सामोरे जावू शकतो. हिच मानसिक तयारी मला आर्थिक संकटाला सामोरे जाण्याससुद्धा बळ देते. किंवा भविष्यात सामोरे जाण्याची तयारीच आत्ता पासूनच म्हणा.
यातील दुसरं आणि तिसरं कारण हे माझ्या मनाला खूपच भावलं. असा विचार मी कधीही केला नव्हता. उपवास करणे म्हणजे संयम, भावनेवर नियंत्रण आणि संकटाला सामोरे जाण्याची तयारी. मग ती नैसर्गिक असो वा आर्थिक.
त्यादिवशी मयुरी आणि मी आमच्या दोघांनी ब्रायनचा उपवास आणि त्यातून आम्ही घेतलेला धडा यावर जवळपास तासभर चर्चा केली. आपल्या भारतीय जीवन शैलीमध्ये ही उपवास हा आहेच. पण आपण त्या मागचा पूर्ण नीट अर्थ समजून घेण्यात कदाचित कमी पडत असू.
आपली प्रगती. ...चपळ शरीर....आणि मजबूत मन यांचा ऐकमेकांशी नक्कीच काही तरी संबंध हा आहेच. हे अमेरिकेत त्या ब्रायनकडे पाहताना सारखं जाणवत होतं.
चालत रहा 🏃🏃

No comments: